08 March 2021

News Flash

क्रिकेट सोडण्याची भीती वाटते – वासिम जाफर

रणजी क्रिकेटमध्ये ओलांडला 11 हजार धावांचा टप्पा

वासिम जाफर (संग्रहीत छायाचित्र)

विदर्भाचा अनुभवी क्रिकेटपटू वासिम जाफरने नुकतचं रणजी क्रिकेटमध्ये अनोख्या विक्रमाची नोंद केली. बडोद्याविरुद्ध सामन्यात वासिम जाफरने रणजी क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा टप्पा गाठला. ही कामगिरी करताना वासिमने आपला मुंबईचा माजी सहकारी अमोल मुझुमदारचा, रणजी क्रिकेटमधला सर्वात जास्त धावांचा विक्रमही मोडीत काढला. या निमीत्ताने इंडियन एक्स्प्रेसचे क्रीडा प्रतिनीधी देवेंद्र पांडे यांनी वासिमची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा सारांश देत आहोत…..

अवश्य वाचा – वासिम जाफरचा रणजी क्रिकेटमध्ये विक्रम; 11 हजार धावांचा टप्पा गाठणारा पहिला खेळाडू

1) रणजी क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा टप्पा, या कामगिरीकडे तू कसं पाहतोस?

तुमचा मूळ संघ सोडून इतर संघाकडून खेळणं हे नेहमी आव्हानात्मक असतं. विदर्भाकडून खेळताना मी संघाला दोन महत्वाची विजेतेपदं मिळवून देऊ शकलो याचा मला आनंद आहे. मी आता पूर्वीपेक्षा जास्त मेहनत घेतो आहे. नवोदीत खेळाडूंना मार्गदर्शन आणि फलंदाजी या दोन्ही भूमिका निभावणं मला आवडतंय.

2) रोज सकाळी उठणं, व्यायाम करणं..तुला या गोष्टींचा कधी कंटाळा येत नाही? अनेकदा लोकं आशा सोडून देतात..

हो, कधीकधी तुम्हाला कंटाळा येतो. मध्यंतरी दुखापतीमुळे मी दोन हंगाम क्रिकेट खेळू शकलो नाही. मी सध्यातरी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या विचारात नाहीये. निवृत्तीनंतर मी करु तरी काय?? मी दररोज व्यायम करतोय, डाएट प्लान सुरु आहे याचसोबत सरावादरम्यान रोजचं पळणं ही होतंय. विदर्भाने मागच्या हंगामात रणजी आणि इराणी करंडक जिंकला, तो हंगाम मला खेळायला मजा आली. हो, पैसा ही महत्वाची गोष्ट आहे मात्र पैसा हे माझ्यासाठी सर्वकाही नाहीये. मुंबईत असतानाही मी अजुन क्लब क्रिकेट खेळतो.

3) सितांशू कोटकने एकदा, मी क्रिकेट सोडलं तर नंतर काय करायचं याची भीती वाटत असल्याचं म्हटलं होतं, तुलाही अशी भीती वाटते का?

निवृत्तीनंतर गोष्टी अचानक बदलतात, हे भीतीमागचं खरं कारण असावं. निवृत्तीनंतर मला 9 ते 5 ऑफीसमध्ये बसावं लागेल किंवा प्रशिक्षक म्हणून काम करावं लागेल. कदाचीत मी देखील या पर्यायांचा विचार करेन. सलग 20 ते 25 वर्ष क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या मनात ही भीती असतेच. मलाही क्रिकेट सोडण्याची भाती वाटते, मात्र ज्यावेळी माझ्या संघाला मी ओझं वाटायला लागेन त्याक्षणाला मी निवृत्ती स्विकारेन.

4) या प्रवासादरम्यानच्या काही आठवणी लक्षात आहेत का?

माझ्यासाठी धावा करणं ही गोष्ट नेहमी महत्वाची राहिलेली आहे. मी विक्रमांचा विचार करत नाही. मात्र ज्यावेळी मी 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला होता तो क्षण मला आठवतोय. रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत मी आणि सचिनने शतक झळकावलं होतं आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनने आमचा सत्कार केला होता.

5) स्थानिक क्रिकेटमध्ये तुला सर्व खेळाडू आदराने बघतात. पण कधी कोणत्या गोलंदाजाने तुला बाद करायला शेरेबाजी केली आहे का?

हो, कधीकधी प्रत्यत्न होतो तसा. पण तो सर्व प्रकार हा खिळाडूवृत्तीने होत असतो. ज्याप्रमाणे राहुल द्रविड फलंदाजीसाठी मैदानात आल्यानंतर सर्व खेळाडू त्याच्याकडे आदराने पहायचे, त्याचप्रमाणे मलाही आदर मिळतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2018 3:11 pm

Web Title: i fear about quitting cricket says vidarbha experienced batsman wasim jaffer
टॅग : Vidarbha
Next Stories
1 Ind vs Aus : भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर
2 क्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणी फलंदाजाने १६ चेंडूत चोपल्या ७४ धावा
3 भारताला वचपा काढण्याची संधी
Just Now!
X