News Flash

शमीची मुलगी ‘आयसीयू’त असल्याची कल्पना नव्हती- विराट कोहली

शमीने सामन्यादरम्यान मला याबद्दल कोणतीच माहिती दिली नव्हती

कोलकाता कसोटीत शमीने शानदार प्रदर्शन केले होते.

कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यावेळी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची १४ महिन्यांची मुलगी रुग्णालयात दाखल होती. पण त्याने याची माहिती आपल्या सहकाऱयांना देखील दिली नव्हती. शमीची मुलगी रुग्णालयात दाखल असल्याची कल्पना त्याने संघात कोणत्याच खेळाडूला दिली नसल्याची माहिती समोर आली आहे. शमीने सामन्यादरम्यान मला याबद्दल कोणतीच माहिती दिली नव्हती. मात्र, सामना झाल्यानंतर त्याने मुलगी रुग्णालयात दाखल असल्याचे मला सांगितले होते, असे कर्णधार विराट कोहलीने सांगितले.

वाचा: १४ महिन्याची मुलगी ‘आयसीयू’मध्ये असतानाही मोहम्मद शमी भारतासाठी खेळत राहीला

शमी हा एक उत्तम खेळाडू आहे. त्याच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक करावे तितके कमी असल्याचेही तो म्हणाला. कोलकाता कसोटीत शमीने शानदार प्रदर्शन केले होते. न्यूझीलंडच्या अनेक फलंदाजांना त्याने तंबूत पाठवले. या सामन्यात त्याने ६ बळी मिळवले. सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांनी चक्क खुर्च्यांवर उभे राहून त्याच्या या कामगिरीला दाद देत त्याचे मनोबल वाढविले. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला विजय प्राप्त करून देण्यात मुख्य भूमिका बजाविणाऱ्या शमीची चिमुकली आयसीयूमध्ये भर्ती असतानादेखील तो देशासाठी खेळत राहिला.
कसोटी सामन्याच्या दोन दिवसआधी शमीच्या १४ महिन्याच्या मुलीला आयसीयूमध्ये भर्ती करण्यात आले होते. तिला ताप आणि श्वसनाचा त्रास जाणवत होता. सामन्यादरम्यान शमी खेळ संपल्यानंतर स्टेडियममधून निघून आपल्या चिमुकलीला पाहाण्यासाठी थेट रुग्णालयात जात असे. नंतर रात्री हॉस्टेलमध्ये परतत असे. हॉस्पिटलमध्ये मुलीला पाहिल्यानंतर जेव्हा मी रात्री परतत असे तेव्हा प्रत्येक दिवशी संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्याला खूप प्रेरणा देत होता, असे विराटचे कौतुक करताना शमी म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 7:19 pm

Web Title: i had no clue mohammed shamis daughter was in the icu says virat kohli
Next Stories
1 भारत दौऱयाआधी इंग्लंडला मोठा धक्का
2 अश्विन पुन्हा अव्वल, रहाणेच्या क्रमवारीत सुधारणा
3 दिपा कर्माकर ‘बीएमडब्ल्यू’ परत करणार, देखभालीचा खर्च न परवडणारा!
Just Now!
X