भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे चाहते आता तुम्हाला जगभरात सापडतील. लहान मुलं, तरुण-तरुणी यांच्यासोबत अगदी वयोवृद्ध माणसांमध्येही विराट कोहली तितकाच लोकप्रिय आहे. आता या चाहत्यांमध्ये आणखी एका हायप्रोफाईल चाहत्याची भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रीडा मंत्री ब्रिजेट मॅकेन्झी या देखील विराट कोहलीच्या खेळाच्या प्रेमात आहेत. भारतीय संघाने सिडनी कसोटी सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या निवासस्थानाला भेट दिली.

अवश्य वाचा – BLOG : सिडनीचं मैदान, स्टिव्ह वॉ चा अखेरचा सामना मात्र लक्षात राहिला तो सचिन रमेश तेंडुलकर !

“विराट कोहलीशी ओळख करुन देत असताना मॅकेन्झी म्हणाल्या, याच्या खेळाच्या मी प्रेमात आहे. विराट सध्या जगातला सर्वोत्तम फलंदाज आहे, ज्या उत्साहामध्ये तो खेळपट्टीवर उतरतो त्याला पाहणं खरचं आनंददायी असतं.” विराट कोहलीची ओळख करुन देत असताना मॅकेन्झी यांनी प्रेमाची कबुली दिली आहे. गुरुवारपासून दोन्ही देशांमध्ये सिडनीच्या मैदानावर चौथा कसोटी सामना सुरु होणार आहे. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. अखेरचा कसोटी सामना जिंकून ही मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी भारतीय संघाकडे आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : इतिहास घडवायचा हे लक्ष्य समोर ठेऊन आम्ही खेळत नाही – विराट कोहली