करोना विषाणूचा सामना करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात सर्व भारतीय क्रिकेटपटू आपल्या घरी आहेत. या काळात हे खेळाडू आपल्या परिवारासोबत वेळ घालवत तर कधी आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर गप्पा मारत आपला वेळ घालवत आहेत. टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माही आपल्या दुखापतीमधून आता सावरला आहे. नवीन वर्षात न्यूझीलंड दौऱ्यात अखेरचा टी-२० सामना खेळताना रोहित शर्माला दुखापत झाली होती. क्रिकेटची ठप्प पडलेली गाडी सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने देशात मैदानं आणि Sports Complex सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र सरावाला सुरुवात करण्याआधी रोहित शर्माला सर्वात आधी आपली फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे.

अवश्य वाचा – करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आयसीसीचे पंच-खेळाडूंसाठी कठोर नियम

“लॉकडाउन जाहीर होण्याच्या एक आठवडा आधी मी खेळण्यासाठी तयार झालो होतो. मी त्यावेळी फिटनेस टेस्ट देण्यासाठी तयारी केली होती, पण नेमकं त्याचदरम्यान लॉकडाउनची घोषणा करण्यात आली मला सर्व गोष्टी पुढे ढकलाव्या लागल्या. ज्यावेळी सर्व काही सुरु होईल, त्यावेळी सर्वात आधी मला NCA ला जाऊन फिटनेस टेस्ट द्यावी लागेल. ही फिटनेस टेस्ट पास केल्यानंतर मी सरावासाठी आणि भारतीय संघात खेळण्यासाठी पात्र ठरेन.” रोहित शर्मा La Liga फेसबूक पेजशी बोलत होता.

अवश्य वाचा – फुटबॉल प्रेमींसाठी आनंदाची बातमी, La Liga स्पर्धेला स्पेन सरकारची मंजुरी

केंद्र सरकारने मैदानं सुरु करायला परवानगी दिलेली असली तरीही महाराष्ट्र सरकारने रेड झोन मधील विभागात अद्याप मैदानं सुरु करण्याची परवानगी दिलेली नाही. दरम्यान, शार्दुल ठाकूरने पालघरमध्ये आपल्या घराजवळील मैदानावर सरावाला सुरुवात केली आहे. Outdoor Training सुरु करणारा शार्दुल पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

अवश्य वाचा – पहिला मान ठाकूर साहेबांचा ! Outdoor Training सुरु करणारा शार्दुल भारताचा पहिला क्रिकेटपटू