काही ज्येष्ठ खेळाडूंसोबत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुद्रा आणि हस्ताक्षर असलेल्या मोजक्या सोनेरी नाण्यांचे आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सचिनच्याच हस्ते अनावरण झाले.
वॅल्यूमार्ट गोल्ड आणि ज्युवेल यांच्यातर्फे आज ज्येष्ठ क्रिकेटपटूंच्या उपस्थितीत प्रत्येकी दहा ग्रॅम वजन असलेल्या एक लाख सचिन तेंडुलकर सोनेरी नाण्यांचे अनावरण करण्यात आले.  
चोवीस कॅरेट सोन्याच्या या नाण्याची किंमत ३४ हजार रूपये असून valuemartgold.com या संकेतस्थळावर आणि देशातील महात्वाच्या सोन्याच्या दुकानांमध्ये ती उपलब्ध आहेत.   
वॅल्यूमार्ट गोल्ड कंपनीने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सचिनसोबत आपला ब्रॅन्ड अॅबॅसिडर म्हणून तीन वर्षांसाठी करार केला आहे.
मैदानावर मी अनेक सोनेरी क्षण अनुभवले आहेत. त्यामध्ये काही सुंदर क्षण आहेत पण हा क्षण त्या सर्वांपेक्षा वेगळा आहे. माझ्यातर्फे सर्वप्रथम सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा कारण आजचा दिवस हा हिंदूंच्या दिनदर्शिकेतील महत्वाचा दिवस आहे, असं सचिन तेंडुलकर या नाण्याच्या अनावरण प्रसंगी म्हणाला.
मला सोनं खरेदी करायला आवडतं. माझ्या तरूणपणी मी एक सोन्याची साखळी खरेदी केली होती आणि माझ्या गळ्यात ती नेहमी असते.   
अशा प्रसंगी तुमच्या अर्धांगिणी सोनं खरेदी करत असतात आणि ते सहाजिकच आहे. भारतात सोन्याला एक वेगळं महत्व आहे आणि अशा वेळी तुमचा चेहरा आणि हस्ताक्षर असलेलं नाणं बाजारात येणं याला वेगळं महत्व आहे.
खेळाडूमध्येही सोन्याला खूप भाव आहे. तुम्हाला खरं वाटत नसेल कर तुम्ही वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना विचारू शकता. प्रत्येकजण सोन्याच्या खरेदीसाठी उत्सुक असतो. सर्वप्रथम तुम्हाला पेंडल असेलेली सोन्याची साखळी हवी असते, असंही सचिन पुढे म्हणाला.