दक्षिण आफ्रिकेचा सर्वोत्तम क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांच्यातील मैत्री सर्वश्रृत आहे. आपण या दोघांनाही एकमेकांवर कौतुकाचा वर्षाव करताना आपण पाहिले आहे. मी सर्व प्रकारचे फटके मारत असलो तरी एबी डिव्हिलियर्ससारखे फटके खेळू शकत नसल्याचे विराट कोहलीने इडिया टूडेला सांगितले आहे.

विराटने आयपीएलच्या या हंगामात २०१ धावा करत अव्वल स्थान गाठले आहे. कोहलीने, मी सर्व प्रकारच्या खेळात उत्तम फलंदाजी करु शकतो परंतू डिव्हिलियर्ससारखे फटके खेळू शकत नसल्याचे सांगितले.

या आधी डिव्हिलियर्सने विराटचे कौतुक केले असून सध्याच्या क्रिकेट विश्वातील विराट कोहलीहा सर्वोत्तम फलंदाज असल्याचे म्हटले आहे.

२०११ पासून कोहली आणि डिव्हिलियर्स आरसीबीसाठी एकत्र खेळत आहे. आयपीएलच्या इतिहासात या दोन्ही स्टार क्रिकेटपटूंनी आपल्या फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांना अनेक आनंदाचे क्षण दिले आहेत. आयपीएलमध्ये कोहली आणि डिव्हिलियर्सने दोनवेळा दोनशे धावांची भागीदारी केली आहे. ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये अशी विक्रमी भागिदारी करणारी जगातील ही एकमेव जोडी आहे.

आयपीएल २०१८ मधील सर्वाधीक धावा करणारे फलंदाज

विराट कोहली ( रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु ) – २०१

संजू सैमसन ( राजस्थान रॉयल्स ) – १८५

ख्रिस गेल ( किंग्ज इलेव्हन पंजाब ) – १६७

नीतीश राणा ( कोलकाता नाईट रायडर्स ) – १६२

लोकेश राहुल ( किंग्ज इलेव्हन पंजाब ) – १५३