25 September 2020

News Flash

प्रीती झिंटाने अपमान केला नाही – बांगर

आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबची सहमालक प्रीती झिंटाने प्रशिक्षक संजय बांगर यांचा अपमान केल्याचे वृत्त प्रसारित झाले होते.

आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबची सहमालक प्रीती झिंटाने प्रशिक्षक संजय बांगर यांचा अपमान केल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. पण या वृत्ताचा बांगर यांनी इन्कार केला असून झिंटा यांनी आपल्याला अपमानित केले नसल्याचे त्यांनी सांगितले.
‘‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून आम्हाला एका धावेने पराभव पत्करावा लागला. त्या सामन्यानंतर खेळाडूंच्या संघाची बैठक झाली, या वेळी संघाचे मालकही उपस्थित होते. या पराभवामुळे खेळाडू नाराज झाले, पण या वेळी माझ्याविरुद्ध असभ्य भाषेचा प्रयोग करण्यात आला नाही. याबाबत प्रसारमाध्यमांमधून चुकीचे वृत्त प्रसारित झाले आहे,’’ असे बांगर यांनी म्हटले आहे.
या वृत्ताचा इन्कार करताना प्रीती म्हणाली, ‘‘मी प्रशिक्षकांचा अपमान केलेला नाही किंवा त्यांच्याविरुद्ध अपशब्दही उच्चारलेला नाही. मी कोणत्याही प्रकारचे असभ्य वर्तन केलेले नाही. हे सारे खोडसाळपणाचे आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2016 12:31 am

Web Title: i was not abused by preity zinta sanjay bangar
Next Stories
1 सुशीलला वगळल्याचा महासंघाकडून इन्कार
2 प्रिती झिंटाकडून प्रशिक्षक संजय बांगर यांना शिवीगाळ!
3 ऑलिम्पिकसाठीच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत नाव नसल्याने सुशील कुमार नाराज
Just Now!
X