26 November 2020

News Flash

जोपर्यंत शरीर साथ देतंय, तोपर्यंत खेळत राहीन ! – इशांत शर्माचा निर्धार

इशांत शर्माला यंदाचा मानाचा अर्जुन पुरस्कार

भारतीय कसोटी संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज इशांत शर्माचा नुकताच अर्जुन पुरस्काराने सन्मान करण्यात आला. इशांत सध्या आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी युएईत आहे. देशभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता यंदाचं राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण हे व्हर्च्युअल पद्धतीने पार पडलं. २००७ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या इशांत शर्माने गेली १३ वर्ष भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. यापुढे शरीर जोपर्यंत साथ देतंय तोपर्यंत खेळत राहणार असल्याचा निर्धार इशांत शर्माने केला आहे.

“लहानपणापासूनच मला क्रिकेटमध्ये आवड आहे आणि या खेळातच मला करिअर करायचं आहे हे मी ठरवलं होतं. प्रत्येक सामन्यात मी १०० टक्के कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आलो आहे. प्रत्येक सामन्यानंतर भारतीय संघाला फायदा होईल हा विचार ठेवून मी माझ्या कामगिरीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आलो आहे. जोपर्यंत माझं शरीर मला साथ देतंय तोपर्यंत मी खेळत राहीन”, असं म्हणत इशांतने आपल्याला मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत.

३१ वर्षीय इशांत शर्मा हा भारतीय संघाच्या अनुभवी गोलंदाजांपैकी एक मानला जातो. ९७ कसोटी, ८० वन-डे आणि १४ टी-२० सामन्यांत इशांतने भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. इशांत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 1:41 pm

Web Title: i will continue to play till the time my body allows says ishant sharma psd 91
Next Stories
1 रैनाच्या जागी खेळणार ‘हा’ मराठमोळा फलंदाज; CSKच्या मालकांनी दिले संकेत
2 VIDEO: कमाल… बॅन्टनने लगावलेला हा विचित्र षटकार पाहाच
3 बाबर आझमचा पराक्रम; विराट, फिंचच्या विक्रमाशी बरोबरी
Just Now!
X