News Flash

मी सुधारुन दाखवतो क्रिकेट संघ ! पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी उचलला विडा

अमेरिकेतील कार्यक्रमात केलं वक्तव्य

२०१९ विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाचं आव्हान साखळी फेरीमध्येच संपुष्टात आलं. अखेरच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करुनही, धावगतीच्या निकषात मागे पडल्यामुळे पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत दाखल होऊ शकला नाही. त्यातच भारताविरुद्ध सामन्यातही पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. या निकालामुळे पाक क्रिकेटपटू टीकेचे धनी बनले होते. आता आपल्या देशाच्या क्रिकेट संघाची बिघडलेली घडी व्यवस्थित बसवण्याचं आव्हान पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी स्विकारलं आहे.

अमेरिकेतील एका कार्यक्रमात इम्रान खान यांनी, पाकिस्तानच्या संघाविषयी आपले मत व्यक्त केले. त्याचबरोबर संघाची नव्याने बांधणी करणार असल्याचेही संकेत दिले आहेत. “मी स्वतः इंग्लंडमध्ये क्रिकेट शिकलो. यामुळे मी माझ्या सहकाऱ्यांच्या खेळात सुधारणा आणण्यात यशस्वी ठरलो होतो. हा विश्वचषक संपल्यानंतर मी पाकिस्तानच्या संघाला सुधारुन दाखवण्याचं ठरवलं आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, आगामी विश्वचषकात तुम्ही पाकिस्तानच्या सक्षम संघाला पाहाल. यासाठी सिस्टीममध्ये काही बदल करावे लागतील, आणि नवीन तरुणांनाही संधी द्यावी लागेल.”

इम्रान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने १९९२ साली विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर मात्र पाकिस्तानला एकदाही विश्वचषक जिंकला आलेला नाही. इम्रान हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2019 6:18 pm

Web Title: i will fix pakistan cricket world cup winning skipper and current pm imran khan vows for revamp psd 91
टॅग : Imran Khan
Next Stories
1 विराट आणि रोहितमध्ये वितुष्ट? गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण म्हणतात….
2 संघात निवड करायची की नाही, तुम्हीच ठरवा ! धोनीकडून चेंडू निवड समितीच्या कोर्टात
3 सलाम बॉस ! सुवर्णकन्या हिमा दासचं ऋषभ पंतकडून कौतुक
Just Now!
X