19 January 2021

News Flash

लग्नाआधीच्या भेटीतच सानियाने शोएबला सांगितल…काहीही झालं तरी माझा पाठींबा भारतालाच !

सानियाने सांगितला तो प्रसंग...

आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये सानिया मिर्झाने भारताचं नाव मोठं केलं. अनेक महत्वाच्या स्पर्धांची विजेतेपदं सानियाने पटकावली. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत विवाह झाल्यानंतर सानिया सोशल मीडियावर नेहमी चर्चेचा विषय बनलेली असते. २०१० साली सानिया आणि शोएब यांचं लग्न झालं. Sportskeeda संकेतस्थळाशी बोलत असताना सानियाने आपल्या आणि शोएबच्या रिलेशनशिपबद्दल भाष्य केलं.

“आमचं नातं खूप निखळ आहे. आम्ही दोघेही खूप मजा करत असतो. अनेकांना वाटतं की मी खूप बोलत असेन पण मुळात असं काही नाहीये. शोएब माझ्यापेक्षा जास्त बोलत असतो. आम्ही आमचं प्रोफेशन कधीही नात्यात आणू देत नाही. आम्ही दोघेही खेळाडू आहोत, आपल्या देशाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करणं आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. ज्यावेळी आम्ही लग्नाआधी भेटायचो, त्यावेळी मी एक गोष्ट त्याला सांगितली होती की काहीही झालं तरी चालेल मी नेहमी भारतालाच पाठींबा देत राहीन. यावर तो म्हणायचा की भारताविरुद्ध माझी कामगिरी नेहमी चांगली होते.”

गेली अनेक वर्ष शोएब आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो आहे आणि आतापर्यंत त्याने जे काही साध्य केलंय त्याचा मला अभिमान असल्याचंही सानिया म्हणाली. शोएब आणि सानिया यांना दोन वर्षांचा मुलगा असून त्याचं नाव इझान आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 2:25 pm

Web Title: i will support india no matter what sania mirza recalls banter with shoaib malik psd 91
Next Stories
1 Video : खूर्चीवरुन पडला पाकिस्तानी खेळाडू, इतर सहकाऱ्यांनाही आवरलं नाही हसू
2 IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी रायन हॅरिसची नियुक्ती
3 ७ धावांत ५ बळी… बुमराहने आजच केली होती धडाकेबाज कामगिरी
Just Now!
X