२०१६मध्ये होणाऱ्या विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पध्रेत सहभागी होण्यासाठी भारताचा वेळा जगज्जेता विश्वनाथन आनंद उत्सुक आहे. आव्हानवीराच्या स्पध्रेसाठी आपण पुढील वर्षी तयारीला लागू, असे आनंदने सांगितले.
‘‘विश्व अजिंक्यपद स्पध्रेत कुणाविरुद्ध खेळायचे आहे, याची कल्पना नसल्यामुळे मी आतापासून या स्पध्रेचा विचार केलेला नाही. पुढील वर्षी मात्र मी या स्पध्रेबाबत गांभीर्याने विचार करीन,’’ असे आनंदने मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘‘मी आगामी स्पर्धाकडे माझे लक्ष केंद्रित केले आहे. या स्पर्धाचा चांगला सराव झाल्यावर मला एप्रिल महिन्यात होणाऱ्या अझरबैजान स्पध्रेसाठी सज्ज होता येईल,’’ असे आनंदने सांगितले.‘‘