News Flash

चिंता नको, माझ्या गर्लफ्रेंडला राणीसारखं वागवेन, लोकांपासून लपवणार नाही – लोकेश राहुल

राहुल आणि निधीच्या रिलेशनशीपबद्दल चर्चा सुरु होती

रिलेशनशीपच्या चर्चेवर निधी-राहुलकडून स्पष्टीकरण

काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज लोकेश राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री निधी अग्रवाल यांना एकत्र पाहिलं गेलं होतं. त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. यानंतर राहुल आणि निधी अग्रवाल रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा रंगली होती, मात्र या भेटीवर आपलं मत मांडत निधी अग्रवाल आणि लोकेश राहुल यांनी आपलं मौन सोडलं आहे.

“होय, मी आणि राहुल एकत्र जेवायला गेलो होतो. आम्ही दोघं लहान असल्यापासून एकमेकांना ओळखतो. राहुल क्रिकेटकडे वळण्याआधी आणि मी अभिनेत्री होण्याआधीपासून आमची मैत्री आहे. आमचं शिक्षण एकत्र झालं नसलं तरीही आमच्यात लहानपणापासून घनिष्ट मैत्री आहे.” राहुलसोबत सुरु असलेल्या रिलेशनशीपबद्दलच्या चर्चांना निधीने पूर्णविराम दिला.

राहुलने दुसऱ्या बाजूला निधीसोबतच्या भेटीनंतर सुरु असलेल्या चर्चांवर थोडी तिखट प्रतिक्रीया व्यक्त केली. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राहुल म्हणाला, “एक मुलगा आणि मुलगी चांगले मित्र असणं ही गोष्ट पचवणं इतकं कठीण आहे का?? आम्ही दोघं लहानपणापासून एकमेकांना ओळखतो, आम्ही दोघंही एकाच शहरात राहतो. त्यावेळी निधीसोबत माझे बंगळुरुतले आणखी ३-४ मित्र होते. ज्यावेळी मी कोणत्याही मुलीसोबत डेट करत असेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन. माझ्या गर्लफ्रेंडला मी राणीसारखं वागवीन, कोणतीही गोष्ट लपवून ठेवणार नाही.”

बॉलिवूड आणि क्रिकेटचं नात जुनं आहे. याआधीही अनेक क्रिकेटपटूं आणि बॉलिवूड तारकांचं प्रेमप्रकरण समोर आलेलं आहे. यातील काही खेळाडूंनी बॉलिवूड तारकांसोबत लग्नही केलं. काही महिन्यांपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा झालेला लग्नसोहळा हे यातलच एक उदाहरण. त्यामुळे राहुल आणि निधी अग्रवालने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर या दोघांबद्दलची चर्चा कमी होते का हे पहावं लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 2:50 pm

Web Title: i will treat my woman like a princess and not do any hiding says kl rahul on his and nidhi agrawal relationship
Next Stories
1 Video : ‘गेल डन!’; नेमबाजीतही गेल सरस… हा व्हिडीओ पाहाच
2 Intercontinental Cup – भारतात फुटबॉल फिव्हर; भारताचे सर्वच्या सर्व सामने ‘हाऊसफुल्ल’
3 न्यूझीलंड क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांचा राजीनामा
Just Now!
X