बांगलादेशविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात भारताने विजय मिळवत ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-१ ने बाजी मारली. दीपकने ३.२ षटकांत ७ धावा देऊन ६ बळी घेतले होते. या सामन्यात दीपकने हॅटट्रीकही नोंदवली. गोलंदाजीआधी कर्णधार रोहित शर्माने चहरच्या खांद्यावर एक महत्वाची जबाबदारी सोपवली होती, रोहितने ते शब्द ऐकताच चहरला बळ मिळालं आणि त्याने सामन्यात ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली.

अवश्य वाचा –  Video : कसला निर्लज्ज माणूस आहेस रे ! चहल दीपक चहरला असं का म्हणाला असेल?

“रोहित मला म्हणाला, आज मी तुझा बुमराहसारखा वापर करणार आहे. मी निर्णयाक षटकांमध्ये तुझा वापर करेन, माझ्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची होती. तणावाच्या प्रसंगात जर कर्णधार मला एखादी जबाबदारी देत असेल तर माझ्यावर तो विश्वास टाकतोय असं मी समजतो. ज्यावेळी माझ्यावर कोणीही विश्वासाने जबाबदारी सोपवत नाही, त्यावेळी मला वाईट वाटतं. त्यामुळे अशा पद्धतीने कर्णधार तुमच्यावर विश्वास टाकतो, तेव्हा एक गोलंदाज म्हणून तुमच्यासाठी ही गोष्ट हुरुप वाढवण्यासारखी असते.” तिसरा सामना संपल्यानंतर चहर IANS वृत्तसंस्थेशी बोलत होता.

अवश्य वाचा – भारताच्या मालिकाविजयावर कर्णधार रोहित खुश, गोलंदाजांना दिलं श्रेय

दरम्यान, बांगलादेशविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या दीपक चहरने आयसीसीच्या टी-२० क्रमवारीतही मोठी झेप घेतली आहे. आपल्या आधीच्या क्रमवारीवरून ८८ अंकानी झेप घेत दीपक चहर थेट ४२ व्या स्थानी पोहचला आहे.

अवश्य वाचा – ICC T20I Ranking – दीपक चहरची क्रमवारीत मोठी झेप