News Flash

रोहित शर्माला लागलेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेचे वेध, म्हणतो BCCI ने काहीतरी तोडगा काढावा !

वर्षाअखेरीस टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

संपूर्ण जगभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. सर्व महत्वाच्या स्पर्धा सध्या बंद आहेत. बीसीसीआयनेही आयपीएलच्या तेराव्या हंगामासाह सर्व महत्वाच्या स्पर्धा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केल्या आहेत. या काळात भारतीय खेळाडू घरी राहत आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माला लॉकडाउनमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेध लागले आहेत. वर्षाअखेरीस टीम इंडिया ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे, ज्यात दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल. ही मालिका रद्द झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मोठं नुकसान होणार आहे. ज्यामुळे बीसीसीआयनेही ही मालिका खेळण्याची तयारी दाखवली आहे. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माही ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी उत्सुक आहे.

अवश्य वाचा – क्रिकेटची गाडी रुळावर आणण्यासाठी BCCI ची तयारी

“मला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायला नेहमी आवडतं. मागच्या वेळी आम्ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिका जिंकलो होतो, आमच्या संघासाठी ती एक मोठी कामगिरी होती.या वर्षाअखेरीस भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका व्हावी अशी माझी इच्छा आहे. माझी इच्छा आहे की बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांनी या मालिकेसाठी काहीतरी तोडगा काढावा. प्रेक्षकांसाठीही ही स्पर्धा पाहणं चांगलं असेल तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात होण्यासाठीही ही मालिका योग्य आहे.” ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरशी रोहित इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटवर बोलत होता.

अवश्य वाचा – रोहित शर्मा म्हणतो, शिखर धवन वेडा माणूस आहे !

यावेळी बोलत असताना रोहित शर्माने आपला सहकारी शिखर धवनबद्दलही अनेक गुपितं यावेळी सांगितली. शिखर धवन फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर चांगला खेळतो, पण ज्यावेळी फटकेबाजीची वेळ येते त्यावेळी तो त्यांच्यावर फारसा प्रहार करत नाही. त्याला कधीही पहिला चेंडू खेळायचा नसतो, रोहित शिखरविषयी बोलत होता. “शिखर धवन वेडा माणूस आहे, त्याला कधीही पहिला चेंडू खेळायचा नसतो. त्याला फिरकीपटूंना फटकेबाजी करायची नसते. कधीकधी तो खूप विचित्र वागतो. कधीकधी तुम्ही सामन्यात एखादी रणनिती आखत असता आणि पाच सेकंदांनी हा माणूस विचारतो, काय म्हणत होतास?? विचार कर, तुम्ही सामन्यात खूप तणावाखाली असता आणि हा माणूस असं काहीतरी बोलून जातो. अशा गोष्टींमुळे तुम्हाला कधीकधी राग येतो.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 3:55 pm

Web Title: i wish bcci ca manage something for australia india test series says rohit sharma psd 91
Next Stories
1 १९ वर्षाचा सचिन कसा दिसायचा माहितीये का?
2 क्रिकेटची गाडी रुळावर आणण्यासाठी BCCI ची तयारी
3 Video : पाहा वॉर्नरचा पत्नीसोबत धमाल टिकटॉक डान्स
Just Now!
X