मैदानावर धावांचा रतीब घालणारा विराट कोहली हा आपल्या फिटनेसबद्दलही तितकाच जागृत आहे. याच कारणामुळे काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने शितपेयांची जाहीरात करण्यासाठी नकार दिला. कोणत्याही खेळाडूसाठी शितपेय ही चांगली नसल्याचं विराट कोहलीचं मत आहे. याच कारणासाठी काही महिन्यांपूर्वी विराट कोहलीने पेप्सी या कंपनीची जाहीरात करण्यासाठी नकार दिला होता.

अवश्य वाचा – मैदानी खेळ खेळा आणि समाजमाध्यमांपासून दूर राहा!

‘इकोनॉमिक टाईम्स’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विराट म्हणाला, ज्या पदार्थांचं सेवन मी करत नाही, त्यांची जाहीरात करुन लोकांना तो पदार्थ वापरण्याचा सल्ला देणं मला पटत नाही. पेप्सी कंपनीची ऑफर नाकारल्यानंतर मला अनेक कंपन्यांकडून जाहीरातीसाठी विचारणा झाली होती. मात्र त्यांना हो म्हणावं असं मला वाटलं नाही. कोणत्याही खेळाडूसाठी शितपेय ही योग्य नसल्याचंही विराट कोहलीचं मत आहे.

अवश्य वाचा – महेंद्रसिंह धोनीवर टीका करणं अयोग्य, विराट कोहलीकडून धोनीचा बचाव

विराट कोहली हा आयपीएलमध्ये आतापर्यंत रॉयल चँलेजर्स बेंगलोर या संघाकडून खेळत होता. या संघाचा मालक विजय मल्ल्या याच्या ‘किंगफीशर’ या ब्रँडची जाहीरात करत होता. “मात्र मी दारुची जाहीरात कधीच करत नसल्याचं विराटने आवर्जून नमूद केलं. मी फक्त एनर्जी ड्रिंकची जाहीरात केली असल्याचं विराट म्हणाला.” नुकतच फोर्ब्स मासिकाच्या, सर्वाधीक कमाई करणाऱ्या १०० खेळाडूंच्या यादीत विराटचा समावेश करण्यात आला होता.

अवश्य वाचा – नाश्ता आणि जेवणात काय खातो विराट कोहली? जाणून घ्या विराटचा डाएट प्लान