आयसीसी (ICC) ने या २०१० ते २०२० या दशकातल्या सर्वोत्तम टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी संघाची घोषणा केली आहे. सर्वोत्तम खेळाडूंची निवड करण्यासाठी आयसीसीने एका पोलचं आयोजन केलं होतं. या पोलमध्ये मिळालेल्या मतांच्या आधारावर आयसीसीनं तिन्ही प्रकारच्या संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे दशकातील सर्वोत्तम संघामध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला असल्याचं दिसत आहे.

एकदिवसीय आणि टी ३० संघाच्या कर्णधारपदी धोनीची निवड झाली आहे. तर कसोटी संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडे आलं आहे. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये स्थान मिळवणारा विराट कोहली एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. आयसीसीनं निवडलेल्या दशकातील सर्वोत्तम टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी संघात विराट कोहलीनं स्थान पटकावलं आहे. विराट कोहलीशिवाय एकाही क्रिकेटपटूला तिन्ही प्रकारच्या संघात स्थान पटकावता आलं नाही. त्यामुळे जागतिक क्रिकेटवर विराट कोहलीचं वर्चस्व असल्याचं दिसून येत आहे.

विराट कोहलीनं आपल्या अफलातून फलंदाजी आणि खिलाडूवृत्तीमुळे जागतिक क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिन्ही प्रकराच्या क्रिकेटमध्ये ५० पेक्षा जास्त सरासरीनं धावा काढणारा विराट कोहली एकमेव फलंदाज आहे. याची पोचपावती आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम संघावर नजर मारल्यास मिळू शकते. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान १२ हजार धावा करण्याचा विक्रमही विराट कोहलीच्या नावावर आहे. भारतीय संघाला कसोटीमध्ये अव्वल स्थानवर नेहण्याचा मानही विराट कोहलीलाच मिळतो. त्यामुळे जागितक क्रिकेटवर विराट कोहलीचा दबदबा असल्याचं दिसतेय.

विरोट कोहलीनं ८७ कसोटीतील १४७ डावात ७३१८ धावांचा पाऊस पाडला आहे. यादरम्यान विराट कोहलीनं २७ शतकं झळकावली आहेत. २५१ एकदिवसीय सामन्यातील २४२ डावांत फलंदाजी करताना कोहलीनं १२०४० धावा चोपल्या आहेत. यादरम्यान विराट कोहलीनं ४३ शतकं आणि ६० अर्धशतकं झळकावली आहेत. टी २० च्या ७९ डावांत २५ अर्धशतकाच्या मदतीनं विराट कोहलीनं २९२८ धावा चोपल्या आहेत.

दशकातील सर्वोत्तम टी२० संघ –
रोहित शर्मा, ख्रिस गेल, ऍरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिविलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), कायरन पोलार्ड, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.

दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय संघ –
रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिव्हिलिअर्स, शाकिब अल हसन, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, ट्रेन्ट बोल्ट, इम्रान ताहिर, लसिथ मलिंगा

कसोटी संघ –
अॅलिस्टर कूक, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, विराट कोहली(कर्णधार), स्टिव्ह स्मिथ, कुमार संगकारा (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, आर. अश्विन, बेन्ट स्टोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, जेस्म अँडरसन