News Flash

टी-२० विश्वचषकाच्या भवितव्यावर लवकरच अंतिम निर्णय?? सोमवारी आयसीसीची महत्वाची बैठक

बीसीसीआयचं बैठकीकडे लक्ष

संग्रहित छायाचित्र

गेल्या दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषकाच्या आयोजनबाद्दल आयसीसी लवकरत निर्णय घेण्याची शक्यता आहे. सोमवारी आयसीसीची बैठक पार पडणार आहे, यात टी-२० विश्वचषकाचं आयोजन वर्षभरासाठी पुढे ढकललं जाण्याची अधिकृत घोषणा होण्याचे संकेत मिळत आहेत. आयपीएलचा तेरावा हंगाम आयोजित करण्यासाठी बीसीसीआयला आयसीसीच्या याच निर्णयाची वाट पहावी लागणार आहे.

१८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतू करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता ऑस्ट्रेलियन सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत संपूर्ण देश लॉकडाउन केला. मध्यंतरीच्या काळात ऑस्ट्रेलियन सरकारने नियमांमध्ये शिथीलता आणली होती. परंतू रुग्णांची संख्या वाढताच सरकारने परत लॉकडाउन घोषित केलं आहे. परंतू देशातली एकंदर परिस्थिती आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियावरचं आर्थिक संकट लक्षात घेता, विश्वचषकाचं आयोजन करणं अशक्य असल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याआधीच जाहीर केलं होतं.

२०२१ साली भारतात टी-२० विश्वचषकाचं आयोजन होणार आहे. परंतू भारताने यजमानपदावर आपला हक्क सोडण्यास नकार दिल्यामुळे ऑस्ट्रेलियाला २०२२ सालच्या स्पर्धेचं यजमानपद मिळण्याची शक्यता आहे. आशिया चषक रद्द झाल्यानंतर बीसीसीआयच्या मार्गातला एक अडसर दूर झाला होता. आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी बीसीसीआयने तयारीही सुरु केली आहे. परंतू आयसीसीने टी-२० विश्वचषकाबद्दल अधिकृत घोषणा करेपर्यंत बीसीसीआयला आयपीएलबद्दल अंतिम निर्णय घेता येणं शक्य नाहीये. त्यामुळे आयसीसीच्या घोषणेनंतरच बीसीसीआय आयपीएलच्या तेराव्या हंगामाची तयारी सुरु करेल. भारतातली करोनाची सध्याची परिस्थिती पाहता तेराव्या हंगामाची स्पर्धा युएईमध्ये भरवली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 7:21 pm

Web Title: icc board meet bcci hoping for formal postponement of t20 world cup on july 20 psd 91
Next Stories
1 इंग्लंडच्या खेळाडूकडून नियमाचा भंग, चेंडू चमकवण्यासाठी केला लाळेचा वापर
2 भारतीय गोलंदाजांमध्ये बुमराहचा सामना करणं सर्वात कठीण !
3 BCCI जनरल मॅनेजर साबा करीम यांचा राजीनामा
Just Now!
X