भारतीय संघ हा अत्यंत सदाचारी संघ आहे आणि या संघाचा कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटचे उत्तम प्रतिनिधित्व करतो, अशा शब्दात ICC चे CEO रिचर्डसन यांनी भारतीय क्रिकेटची स्तुती केली. हार्दिक पांड्या याने एका टीव्ही शो मध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणावर प्रश्न विचारले असताना रिचर्डसन यांनी हे उत्तर दिले.

सध्या भारतात हा विषय खूप चर्चेत आहे, हे मला माहिती आहे. पण सामान्यतः भारतीय संघ हा सदाचारी आहे. त्यांच्याकडून गैरवर्तणूक केली जात नाही. मैदानावर खेळतानाही पंचांनी दिलेले निर्णय ते मेनी करतात. सामना खेळताना त्याच्यात खजिलाडूवृत्तीचं दर्शन घडतं. क्रिकेटच्या मैदानावर त्यांची कामगिरी उत्तम आहे, असे रिचर्डसन म्हणाले.

Yuzvendra Chahal Becomes First Bowler To Complete 200 Wickets in IPL
IPL 2024: युझवेंद्र चहलने रचला इतिहास, आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला गोलंदाज
Mr. Gay Nepal 2024
‘मिस्टर गे नेपाळ २०२४’ चा किताब लक्ष्मण मगर यांनी जिंकला; आता लंडनमध्ये करणार प्रतिनिधित्व
jaiswal
जैस्वालला सूर गवसणार? राजस्थान रॉयल्ससमोर आज गुजरात टायटन्सचे आव्हान
Hardik Pandya Rohit Sharma
हार्दिकचे कर्णधारपद धोक्यात? क्रिकेटवर्तुळात चर्चा; माजी क्रिकेटपटूंमध्ये मतमतांतरे

विराट कोहलीचीदेखील त्यांनी स्तुती केली. ते म्हणाले की विराट हा क्रिकेट या खेळाचा सर्वोत्तम प्रतिनिधी आहे तो केवळ टी२० क्रिकेटबद्दलच नव्हे, तर एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटबद्दलही तितकेच आपुलकीने बोलतो.चांगले क्रिकेटपटू कायम सर्व प्रकारचे क्रिकेट खेळण्यास उत्सुक असतात. हेच खऱ्या क्रिकेटपटूचे लक्षण आहे, असेही ते म्हणाले.

पांड्या प्रकरण हे जागतिक स्तरावर तितके मोठे नाही. BCCI आणि भारतीय क्रिकेट व्यवस्थापन लवकरात लवकर पांड्या प्रकरणाचा निकाल देईल, अशी अपेक्षा आहे, असेही रिचर्डसन यांनी नमूद केले.