चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. तमाम क्रिकेटप्रेमींचे डोळे या हाय-व्होल्टेज सामन्याकडे लागले आहेत. मात्र, हा क्रिकेट सामना आणखी एका गोष्टीमुळे महत्त्वाचा ठरणार आहे. या सामन्यात क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणारा सचिन तेंडुलकर समालोचन करणार आहेत. एखाद्या क्रिकेट सामन्याचे समालोचन करण्याची ही सचिनची पहिलीच वेळ असेल. तो हिंदीत समालोचन करणाऱ्या टीमचा भाग असेल. या टीममध्ये सचिनसह आकाश चोप्रा, सुनिल गावस्कर, साबा करीम आणि वीरेंद्र सेहवाग यांचा समावेश आहे. यावेळी काही पाकिस्तानी कॉमेंटेटरदेखील स्टार स्पोर्ट्सच्या हिंदी कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसतील. भारत-पाकिस्तानशिवाय इतर सामन्यांसाठीही सचिन समालोचन करणार किंवा नाही, याबद्दल अद्याप निश्चित माहिती नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार सचिन उद्याच्या सामन्यासाठी कॉमेंट्री करणार असल्याचे निश्चित आहे. त्यासाठी तो इंग्लंडलाही रवाना झाला आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कधी, कुठे, केव्हा रंगणार?; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Afghanistan Cricketer rashid khan
क्रिकेटने अफगाणिस्तानमधील जनता आनंदी – रशीद खान
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
Rohit Sharma gifted special 200 jersey by Sachin Tendulkar
IPL 2024 : रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी रचला इतिहास! सचिन तेंडुलकरकडून मिळालं खास गिफ्ट
India Vs Pakistan bilateral series
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका होणार? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजनासाठी व्यक्त केली इच्छा

यापूर्वी २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान सचिन तेंडुलकरने क्रिकेट तज्ज्ञ म्हणून काम केले होते. त्यानंतर आता सचिन पहिल्यांदाच हिंदीमध्ये समालोचन करणार आहे.  दरम्यान, याबद्दल स्टार स्पोर्टस वाहिनी आणि सचिन तेंडुलकरने आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. यंदाच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेमध्ये क्रिकेट चाहत्यांना क्रिकेटच्या मैदानावर नव्या तंत्रज्ञानाचे दर्शन घडणार आहे. या स्पर्धेत काही फलंदाज विशेष चीप असणारी बॅट घेऊन मैदानात उतरणार आहेत. मैदानात खेळत असताना प्रतिस्पर्ध्यांकडून फलंदाजांविरोधात कशी रणनिती आखली जाते, ते समजून घेणे सुलभ करण्यासाठी बॅटमध्ये कम्प्युटराइज्ड चीप तंत्रज्ञानाचा प्रयोग करण्यात येणार आहे. प्रत्येक संघातील तीन खेळाडू या चीपचा वापर करणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संघातील रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे नावीन्यपूर्ण चीप असणारी बॅट घेऊन मैदानात उतरतील. भारतीय संघ स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना खेळणार असून पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हा नवा प्रयोग करण्यात येईल, अशी चर्चा क्रिकटवर्तुळात रंगताना दिसत आहे.

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात रोहित, अजिंक्य खास बॅट वापरणार?