20 September 2020

News Flash

भारतविरुद्ध श्रीलंका उपांत्य फेरी सामन्यावर पावसाचे सावट

आयसीसी चॅम्पियन्स करंडक इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आय़सीसीच्या चॅम्पियन्स करंडकात कार्डिफ येथे होणाऱ्या भारत विरुद्ध श्रीलंका या उपांत्य़ फेरीच्या सामन्यावर पावसाचे सावट पसरले आहे. कार्डिफमध्ये काल बुधवार

| June 20, 2013 12:31 pm

आयसीसी चॅम्पियन्स करंडक
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आय़सीसीच्या चॅम्पियन्स करंडकात कार्डिफ येथे होणाऱ्या भारतविरुद्ध श्रीलंका या उपांत्य़ फेरीच्या सामन्यावर पावसाचे सावट पसरले आहे.
कार्डिफमध्ये काल बुधवार रात्रीपासून पावसाची ये-जा सुरू आहे. आताही स्टेडियमवर पावसाळी मेघ भरुन आले आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीचा भारत विरुद्ध श्रीलंका अतितटीचा सामना पावसाच्या व्यत्ययाशिवाय होणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. यावेळीच्या मालिकेत श्रीलंका संघाला कोणत्याही सामन्यादरम्यान, पावसाच्या अडचणींना सामोरे जावे लागले नाही. याबाबतीत श्रीलंका नशीबवानच ठरली, परंतु यावेळेस लंकेचे असेच नशीब बलवत्तर राहील असे सांगता येत नाही. सामना पुढे ढकलण्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला नसल्याने आमना आजच होणार आहे. पाऊस आल्यास सामन्यातील षटके कमी होतील. त्यामुळे पुर्ण पन्नास षटकांचा सामना क्रिकेट रसिकांना अनुभवण्यास मिळणे कठीण होऊन बसले आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2013 12:31 pm

Web Title: icc champions trophy india and sri lanka to lock horns under gloomy cardiff sky
Next Stories
1 ‘मी सट्टेबाजांकडून पैसे घेतले होते, पण घाबरुन परत केले’
2 हम से जो टकराएगा.. : भारत अंतिम फेरीत दाखल
3 द. आफ्रिकेवरील विजयासह इंग्लंड अंतिम फेरीत
Just Now!
X