28 February 2021

News Flash

चॅम्पियन्स करंडक विजयी भारतीय संघावर बीसीसीआयची अर्थवृष्टी

आयसीसी चॅम्पियन्स करंडक मालिकेत इंग्लंडवर पाच धावांनी विजय प्राप्त करत भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडकावर नाव कोरले आणि 'टिम इंडिया' पावसात न्हाऊन निघाली पण, हा पाऊस

| June 24, 2013 02:25 am

आयसीसी चॅम्पियन्स करंडक मालिकेत इंग्लंडवर पाच धावांनी विजय प्राप्त करत भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडकावर नाव कोरले आणि ‘टिम इंडिया’ पावसात न्हाऊन निघाली पण, हा पाऊस आहे बक्षिसांचा!
आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी तसेच चॅम्पियन्स करंडक जिंकल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) भारतीय संघासाठी तब्बल १२ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. यानुसार संघातील खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी व संघाच्या सहाय्यक सदस्यांना प्रत्येकी ३० लाख रुपये जाहीर करण्यात आले आहेत.
संघाचे नेतृत्व यशस्वीरित्या सांभाळण्यात महेंद्रसिंग धोनीला यश आले आहे. चॅम्पियन्स करंडक जिंकल्यामुळे भारतीय संघाच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. याचा वेस्टइंडिज येथे होणाऱ्या तिरंगी मालिकेत फायदा होईल. भारत-श्रीलंका-वेस्टइंडिज यांच्या दरम्यान तिरंगी मालिका येत्या २८ जूनपासून सुरू होणार आहे.  

* वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या तिरंगी मालिकेचे वेळापत्रक
२८ जून- वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (साबीना पार्क, जमैका)
३० जून- वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका (साबीना पार्क)
२ जु्लै- भारत विरुद्ध श्रीलंका (साबीना पार्क)    
५ जुलै- वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (क्विन्स पार्क)
७ जुलै- वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका (क्विन्स पार्क)
९ जुलै- श्रीलंका विरुद्ध भारत (क्विन्स पार्क)
११ जुलै- अंतिम सामना (क्विन्स पार्क)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2013 2:25 am

Web Title: icc champions trophy its raining money for the men in blue
Next Stories
1 नायजेरियाला चमत्काराची अपेक्षा!
2 राणे, राऊत, शिर्के, आथरे यांचा भारतीय संघात समावेश आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा
3 उसेन बोल्टला १०० मीटरचे जेतेपद
Just Now!
X