२०१९ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला नवीन विश्वविजेता मिळणार हे आता नक्की झालं आहे. बर्मिंगहॅमच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान इंग्लंडने गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून मात केली आहे. अंतिम फेरीत इंग्लंडची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे. सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय यांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने सामन्यात बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं २२४ धावांचं आव्हान इंग्लंडच्या फलंदाजांनी सहज पूर्ण करुन दाखवलं.
जेसन रॉयने ८५ तर जॉनी बेअरस्टोने ३४ धावा केल्या. हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर जो रुट आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी संयमीपणे फलंदाजी करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
त्याआधी, यजमान इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा डाव ४९ षटकात २२३ धावांत आटोपला. स्टीव्ह स्मिथने ८५ धावांची झुंजार खेळी केली. त्याला अलेक्स कॅरी (४६) आणि मिचेल स्टार्क (२९) यांनी चांगली साथ दिली. पण इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाने केवळ २२३ धावाच केल्या आणि इंग्लंडला २२४ धावांचे आव्हान दिले.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण त्यांचा निर्णय काही प्रमाणात फसला. फिंच, वॉर्नर आणि हँड्सकॉम्ब हे तिघे अवघ्या १४ धावांत बाद झाला. पण स्टीव्ह स्मिथ आणि अलेक्स कॅरी यांनी डाव सावरला. कॅरी ४६ धावांवर बाद झाल्यावर स्मिथने डाव पुढे नेला आणि ८५ धावांची झुंजार खेळी केली. पण दुसऱ्या बाजूने त्याला फलंदाजांची साथ न मिळाल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव २२३ धावांत आटोपला. ख्रिस वोक्स आणि आदिल रशिदने ३-३ तर जोफ्रा आर्चरने २ आणि मार्क वूडने १ गडी बाद केला.
Highlights
स्मिथची एकाकी झुंज; इंग्लंडला २२४ धावांचे आव्हान
यजमान इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा डाव ४९ षटकात २२३ धावांत आटोपला. स्टीव्ह स्मिथने ८५ धावांची झुंजार खेळी केली.
स्टीव्ह स्मिथचे झुंजार अर्धशतक
ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडत असताना स्टीव्ह स्मिथने झुंजार खेळी करत ७२ चेंडूत अर्धशतकी खेळी केली.
सुरुवातीच्या धक्क्यांनंतर ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला
१४ धावांवर ३ गडी गमावलेल्या ऑस्ट्रेलियाला स्टीव्ह स्मिथ आणि अलेक्स कॅरी यांनी सावरले. या दोघांनी अत्यंत सावध खेळी करत १४ व्या षटकात संघाला पन्नाशी गाठून दिली.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाची प्रथम फलंदाजी
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय स्वीकारला.
यजमान संघाची गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून मात
२०१९ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मिळणार नवीन विश्वविजेता, अंतिम फेरीत इंग्लंडसमोर न्यूझीलंडचं आव्हान
इंग्लंड चांगल्या स्थितीत असताना त्यांना दुसरा धक्का बसला. ६५ चेंडूत ८५ धावांवर खेळताना जेसन रॉयला बाद ठरवण्यात आले. कमिन्सने उसळत्या चेंडूवर त्याचा बळी घेतला. पण रिप्लेमध्ये तो बाद नसल्याचे स[स्पष्ट दिसून आले. पंचांनी बाद दिल्यानंतर त्यांच्याशी वाद घालतच तो मैदानाबाहेर गेला. बेअरस्टोच्या वेळी रिव्ह्यू गमावल्यामुळे रॉयला DRS चा आधार घेता आला नाही.
चांगली सुरुवात मिळाल्यानंतर सलामीवीर जॉनी बेअरस्टो बाद झाला. बेअरस्टोने रिव्ह्यूचा पर्याय स्वीकारला पण त्यातही त्याला बाद ठरवण्यात आले.
सलामीवीर जेसन रॉय याने ५१ चेंडूत तुफान फटकेबाजी करत दमदार अर्धशतक ठोकले. ७ चौकार आणि २ षटकार खेचत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि इंग्लंडला मजबूत स्थितीत पोहोचवले.
२२४ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो या दोघांनी सावध खेळी केली आणि १० व्या षटकात इंग्लंडला अर्धशतकी मजल मारून दिली.
यजमान इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा डाव ४९ षटकात २२३ धावांत आटोपला. स्टीव्ह स्मिथने ८५ धावांची झुंजार खेळी केली.
एकीकडे गडी बाद होताना स्टीव्ह स्मिथने झुंजार ८५ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार लगावले. पण चोरटी धाव घेताना स्मिथ धावबाद झाला. पाठोपाठ मिचेल स्टार्कदेखील २९ धावा काढून माघारी परतला.
अष्टपैलू खेळाडू पॅट कमिन्स स्वस्तात माघारी परतला. त्याने १० चेंडूत ६ धावा केल्या.
फटकेबाज खेळी करण्याच्या प्रयत्नात मॅक्सवेल झेलबाद झाला. २ चौकार आणि १ षटकार खेचत २३ चेंडूत २२ धावांवर तो माघारी परतला.
ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडत असताना स्टीव्ह स्मिथने झुंजार खेळी करत ७२ चेंडूत अर्धशतकी खेळी केली.
कॅरी पाठोपाठ मार्कस स्टॉयनीस आदिल रशिदच्या फिरकीचा शिकार ठरला. २ चेंडूत तो शून्यावर पायचीत झाला.
स्मिथच्या साथीने अलेक्स कॅरीने चांगली भागीदारी केली. पण अर्धशतकाच्या जवळ पोहोचल्यावर कॅरी झेलबाद झाला. ७० चेंडूत ४ चौकारांसह ४६ धावा केल्या.
१४ धावांवर ३ गडी गमावलेल्या ऑस्ट्रेलियाला स्टीव्ह स्मिथ आणि अलेक्स कॅरी यांनी सावरले. या दोघांनी अत्यंत सावध खेळी करत १४ व्या षटकात संघाला पन्नाशी गाठून दिली.
नवखा पीटर हँड्सकॉम्ब १२ चेंडूत ४ धावा काढून माघारी परतला. वोक्सने त्याला त्रिफळाचित केले.
ऑस्ट्रेलियाकडून दमदार कामगिरी करणारा डेव्हिड वॉर्नर आजच्या सामन्यात लौकिकाला साजेसा खेळ करू शकला नाही. तो २ चौकार लगावून ९ धावांवर बाद झाला.
जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार फिंच शून्यावर बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. पंचांच्या निर्णयावर फिंचने रिव्ह्यू घेतला मात्र तिसऱ्या पंचांनीही त्याला बाद ठरवले.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय स्वीकारला.