World Cup 2019 – इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या फेरीच्या सामन्यात कर्णधार आरोन फिंच याने दमदार शतक ठोकले. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीस उतरलेल्या वॉर्नर – फिंच जोडीने ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी अर्धशतके केल्यानंतर वॉर्नर बाद झाला, पण कर्णधार फिंचने मात्र शतक ठोकत एक विक्रम केला.

आरोन फिंचने कर्णधारपदाला साजेशी शतकी खेळी केली. त्याने ११६ चेंडूत १०० धावा केल्या. त्याने ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ही खेळी सजवली. या बरोबरच आरोन फिंचने एक मोठा विक्रम केला. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात विश्वचषक स्पर्धेत फिंचचे हे दुसरे शतक ठरले. आतापर्यंत इंग्लंडच्या संघाविरुद्ध एकूण १४ शतके लगावण्यात आली आली आहेत, ही शतके एकूण १३ फलंदाजांनी मिळून ठोकली आहेत. पण दोन शतके ठोकण्याची कामगिरी केवळ फिंचलाच शक्य झाले आहे.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच या दोघांनी दमदार फलंदाजी करत भक्कम सलामी दिली. १२३ धावांच्या सलामी भागीदारीनंतर वॉर्नर बाद झाला. त्याने ६१ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. त्याच्यानंतर फिंचने ख्वाजाच्या साथीने डाव पुढे नेला, पण ख्वाजा २३ धावा करून माघारी परतला. स्टोक्सने त्याच्या त्रिफळा उडवला. फिंचने मात्र दमदार शतक ठोकले. त्याने ११६ चेंडूत १०० धावा केल्या. त्याने ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ही खेळी सजवली. पण मोठा मरताना तो झेलबाद झाला.