दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा डाव ४९ षटकात २२३ धावांत आटोपला. स्टीव्ह स्मिथने ८५ धावांची झुंजार खेळी केली. त्याला अलेक्स कॅरी (४६) आणि मिचेल स्टार्क (२९) यांनी चांगली साथ दिली. पण इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाने केवळ २२३ धावाच केल्या. २२४ धावांचे आव्हान इंग्लंडने सहज पूर्ण केले. या सामन्यात पंच कुमार धर्मसेना आणि इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय या दोघांमध्ये मैदानावर झालेला वाद चर्चेचा विषय ठरला होता. अंतिम सामन्यातही कुमार धर्मसेना यांनाच पंच म्हणून निवडण्यात आले. त्यामुळे सामन्याआधी जेसन रॉय आणि कुमार धर्मसेना यांची झालेली भेट चांगलीच चर्चिली गेली.

२२४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो या दोघांनी शतकी सलामी दिली. त्यानंतर बेअरस्टो माघारी परतला. पाठोपाठ जेसन रॉयलाही बाद ठरवण्यात आले. पण आपण बाद नसल्याचे सांगत त्याने थेट कुमार धर्मसेना आणि मरियस इरॅस्मस या पंचांशी भर मैदानातच राडा घातला. पण अंतिम सामना सुरु होण्याआधी पंच कुमार धर्मसेना आणि जेसन रॉय यांची एक छोटीशी भेट घडली. या भेटीचा व्हिडीओ ICC ने ऑफिशिअल साईटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये जेसन रॉय आपल्या कृतीबद्दल स्पष्टीकरण देताना दिसत आहे तर कुमार धर्मसेना त्याच्याशी समजूत काढताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ –

दरम्यान, त्याने मैदानावर पंचांशी वाद घातल्यामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. सामन्याच्या मानधनातील एकूण ३० टक्के रक्कम त्याला दंड म्हणून भरावा लागला. ६५ चेंडूत ८५ धावांवर खेळताना जेसन रॉयला बाद ठरवण्यात आले. कमिन्सने उसळत्या चेंडूवर त्याचा बळी घेतला. पण रिप्लेमध्ये तो बाद नसल्याचे स[स्पष्ट दिसून आले. पंचांनी बाद दिल्यानंतर त्यांच्याशी वाद घालतच तो मैदानाबाहेर गेला. बेअरस्टोच्या वेळी रिव्ह्यू गमावल्यामुळे रॉयला DRS चा आधार घेता आला नाही.