News Flash

WC 2019 Final : केवळ खेळाडूच नव्हे; पंचांनीही केला ‘हा’ आगळावेगळा विक्रम

अंतिम सामन्यात पंच कुमार धर्मसेना यांनी एक अनोखा विक्रम केला

विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान इंग्लंड अत्यंत थरारक पद्धतीने सुपर ओव्हरच्या माध्यमातून विश्वविजेता ठरला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले.

लॉर्ड्सच्या मैदानावर रंगलेल्या या सामन्यात पंच म्हणून कुमार धर्मसेना आणि मॅरीस इरॅस्मस या दोघांना निवडण्यात आले होते. या दोघांनी उत्तम कामगिरी करत केवळ मूळ सामनाच नव्हे, तर सुपर ओव्हरमध्येही पंचगिरी केली. या सामन्यात न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोनही संघाच्या खेळाडूंनी दमदार खेळ करत निरनिराळे विक्रम केले. पण पंच कुमार धर्मसेना यांनी केवळ मैदानात उभे राहून एक आगळावेगळा विक्रम केला. विश्वचषक स्पर्धेत एका विश्वविजेत्या संघाचे प्रतिनिधित्व करणारे आणि अंतिम सामन्यात पंच म्हणून काम पाहणारे असे कुमार धर्मसेना पहिलेच व्यक्ती ठरले. १९९६ साली विश्वविजेता झालेल्या श्रीलंकेच्या संघात कुमार धर्मसेना यांचा समावेश होता.

दरम्यान, नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय फसला. इंग्लंडच्या वेगवान माऱ्यापुढे न्यूझीलंडला केवळ २४१ धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडकडून एक बाजू लावून धरत सलामीवीर हेन्री निकोल्स याने संयमी अर्धशतक केले. त्याने ५५ धावांची खेळी केली. तर डावाच्या शेवटच्या टप्प्यात टॉम लॅथम याने ४७ धावांची उपयुक्त खेळी केली. इतर फलंदाजांना मात्र चांगली खेळी करता आली नाही. ख्रिस वोक्स आणि लिअम प्लंकेट या दोघांनी ३-३ बळी टिपले.

या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. पण बेन स्टोक्स आणि जोस बटलर या दोघांनी मोठी भागीदारी करून इंग्लंडच्या आशा पल्लवित केल्या. या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. सामन्यात बटलर बाद झाल्यावर इंग्लंडच्या आशा काहीशा मावळल्या पण स्टोक्सने शेवटपर्यंत तग धरून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत (१५ धावा) सुटला, त्यामुळे मूळ सामन्यातील चौकार षटकारांच्या निकषावर इंग्लंडला नवा विश्वविजेता जाहीर करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2019 2:55 pm

Web Title: icc cricket world cup 2019 final umpire kumar dharmasena record player vjb 91
Next Stories
1 ‘ओव्हर थ्रोच्या सहा धावांचा निर्णय चुकीचाच’, सायमन टॉफेल पंचांवर बरसले
2 World Cup 2019: जाणून घ्या कोणत्या संघाला किती रक्कम बक्षीस म्हणून मिळाली
3 ‘लॉर्ड्स’वर World Cup Final जिंकण्याचा ‘हा’ आहे कानमंत्र!
Just Now!
X