World Cup 2019 IND vs AFG Updates : अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने ११ धावांनी विजय मिळवला. अत्यंत चुरशीच्या लढतीत भारताने दडपणाखाली चांगली कामगिरी करत विजयाचा चौकार लगावला. भारताने प्रथम फलंदाजी करत २२४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मोहम्मद शमीच्या हॅटट्रिकच्या जोरावर भारताने हा विजय संपादन केला. मोहम्मद नबीने अर्धशतक करत चांगली झुंज दिली. पण त्याची झुंज अयशस्वी ठरली.

२२५ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा डावखुरा फलंदाज हजरतुल्लाह त्रिफळाचीत झाला. जायबंदी भुवनेश्वर कुमारच्या जागी संघात स्थान मिळालेल्या मोहम्मद शमीने त्याला बाद केले. हजरतुल्लाहने २४ चेंडूत १० धावा केल्या. पाठोपाठ हार्दिक पांड्याने टाकलेल्या बाउन्सर चेंडूवर गुलबदिन झेलबाद झाला. त्याने ४२ चेंडूत २ चौकारांसह २७ धावा केल्या. ४२ धावांची आश्वासक भागीदारी करणारे अफगाणिस्तानचे दोनही फलंदाज बुमराहच्या निर्धाव षटकात बाद झाले. चौथ्या चेंडूवर रहमत शाह ३६ धावांवर बाद झाला. तर शेवटच्या चेंडूवर हाशमतुल्लाह शाहिदी बुमराहकडेच झेल देऊन २१ धावांवर माघारी गेला. छोटया भागीदारीनंतर असगर अफगाण माघारी परतला. युजवेंद्र चहलने त्याचा अडसर दूर केला.

नजीबुल्लाह झादरानने नबीबरोबर चांगली भागीदारी केली. पण शांत आणि संयमी फलंदाजी करणारा नजीबुल्लाह हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने २३ चेंडूत २१ धावा केल्या. रशीद खानदेखील १४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर मोहम्मद शमीने हॅटट्रिक घेत अफगाणिस्तानचा डाव गुंडाळला. शमीने ४ तर बुमराह, चहल आणि पांड्याने २-२ गडी टिपले.

त्याआधी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना स्पर्धेत दोन शतके ठोकणारा रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्ध स्वस्तात माघारी परतला. मुजीब उर रहमानने त्याला त्रिफळाचीत करत एका धावेवर माघारी धाडले आणि भारताला पहिला धक्का दिला. रोहित शर्मा लवकर बाद झाल्यावर सलामीवीर लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी सावध फलंदाजी करत अर्धशतकी भागीदारी केली. सलामीवीर लोकेश राहुल याने चांगली खेळी केली पण रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्याने ३० धावा केल्या. या दरम्यान दमदार कामगिरी करत कर्णधार विराट कोहलीने ४८ चेंडूत अर्धशतक झळकावले.

चांगली सुरुवात मिळल्यानंतर मोठी धावसंख्या उभारण्यात विजय शंकर अपयशी ठरला. ४१ चेंडूत २९ धावा करून तो रहमत शाहच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. दमदार अर्धशतकी खेळी करणारा कर्णधार विराट कोहली ६३ चेंडूत ६७ धावा करून माघारी गेला. विराटने ५ चौकार लगावले. मोहम्मद नबीला दुसरा बळी मिळाला. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांनी अत्यंत संथ खेळी केली. शेवटच्या टप्प्यात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात धोनी माघारी परतला. धोनीने ३ चौकारांसह ५२ चेंडूत २८ धावा केल्या. केदार जाधवने संयमी अर्धशतक केले. पण तो देखील ६८ चेंडूत ५२ धावा काढून बाद झाला. अफगाणिस्तानकडून नबी, नैब यांनी २-२ तर मुजीब, आलम, रहमत शाह आणि रशीद खान यांनी प्रत्येकी १ बळी टिपला.

Live Blog

23:08 (IST)22 Jun 2019
खूब लढा अफगाणिस्तान... पण अखेर भारताचा विजय

मोहम्मद शमीची दमदार हॅटट्रिक

22:34 (IST)22 Jun 2019
रशीद खान बाद; भारताला सातवे यश

रशीद खान बाद; भारताला सातवे यश

22:12 (IST)22 Jun 2019
नजीबुल्लाह झेलबाद; भारताला सहावे यश

शांत आणि संयमी फलंदाजी करणारा नजीबुल्लाह हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने २३ चेंडूत २१ धावा केल्या.

21:43 (IST)22 Jun 2019
असगर अफगाण माघारी

युजवेंद्र चहलने घेतला बळी, अफगाणिस्तानचा निम्मा संघ माघारी

21:12 (IST)22 Jun 2019
बुमराहचे निर्धाव षटकात २ बळी; सामन्यात रंगत

४२ धावांची आश्वासक भागीदारी करणारे अफगाणिस्तानचे दोनही फलंदाज बुमराहच्या निर्धाव षटकात बाद झाले. चौथ्या चेंडूवर रहमत शाह ३६ धावांवर बाद झाला. तर शेवटच्या चेंडूवर हाशमतुल्लाह शाहिदी बुमराहकडेच झेल देऊन २१ धावांवर माघारी गेला.

20:19 (IST)22 Jun 2019
गुलबदिन झेलबाद; भारताला दुसरे यश

हार्दिक पांड्याने टाकलेल्या बाउन्सर चेंडूवर गुलबदिन झेलबाद झाला. त्याने ४२ चेंडूत २ चौकारांसह २७ धावा केल्या.

19:36 (IST)22 Jun 2019
हजरतुल्लाह त्रिफळाचीत; अफगाणिस्तानला पहिला धक्का

२२५ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना डावखुरा फलंदाज हजरतुल्लाह त्रिफळाचीत झाला. जायबंदी भुवनेश्वर कुमारच्या जागी संघात स्थान मिळालेल्या मोहम्मद शमीने त्याला बाद केले. हजरतुल्लाहने २४ चेंडूत १० धावा केल्या.

18:33 (IST)22 Jun 2019
अफगाणी फिरकीपुढे टीम इंडियाचं 'घालीन लोटांगण'

अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजांपुढे भारताने शरणागती पत्करली. कर्णधार कोहली आणि केदार जाधव यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ५० षटकात २२४ धावा केल्या आणि अफगाणिस्तानला २२५ धावांचे आव्हान दिले. 

18:27 (IST)22 Jun 2019
केदारचे संयमी अर्धशतक

मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधव याने संयमी खेळी करत अर्धशतक केले.

18:22 (IST)22 Jun 2019
हार्दिक पांड्या बाद; भारताला सहावा धक्का

तडाखेबाज खेळीसाठी ओळखला जाणारा हार्दिक पांड्या फलंदाजीत काहीही कमाल करू शकला नाही. त्याने ९ चेंडूत ७ धावा केल्या.

18:00 (IST)22 Jun 2019
संथ खेळीनंतर धोनी माघारी

अत्यंत संथ खेळी केल्यानंतर अखेर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात धोनी माघारी परतला. धोनीने ३ चौकारांसह ५२ चेंडूत २८ धावा केल्या.

17:02 (IST)22 Jun 2019
कर्णधार कोहली माघारी; भारताला चौथा धक्का

दमदार अर्धशतकी खेळी करणारा कर्णधार विराट कोहली ६३ चेंडूत ६७ धावा करून माघारी गेला. विराटने ५ चौकार लगावले. मोहम्मद नबीला दुसरा बळी मिळाला.

16:45 (IST)22 Jun 2019
विजय शंकर पायचीत; भारताला तिसरा धक्का

चांगली सुरुवात मिळल्यानंतर मोठी धावसंख्या उभारण्यात विजय शंकर अपयशी ठरला. ४१ चेंडूत २९ धावा करून तो रहमत शाहच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.

16:28 (IST)22 Jun 2019
कॅप्टन कोहलीचे दमदार अर्धशतक

दमदार कामगिरी करत कर्णधार विराट कोहलीने ४८ चेंडूत अर्धशतक झळकावले.

15:58 (IST)22 Jun 2019
राहुल झेलबाद; भारताला दुसरा धक्का

सलामीवीर लोकेश राहुल याने चांगली खेळी केली पण रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्याने ३० धावा केल्या.

15:53 (IST)22 Jun 2019
राहुल-कोहलीची सावध फलंदाजी

रोहित शर्मा लवकर बाद झाल्यावर सलामीवीर लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी सावध फलंदाजी करत अर्धशतकी भागीदारी केली.

15:16 (IST)22 Jun 2019
रोहित त्रिफळाचीत; भारताला पहिला धक्का

स्पर्धेत दोन शतके ठोकणारा रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्ध स्वस्तात माघारी परतला. मुजीब उर रहमानने त्याला त्रिफळाचीत करत एका धावेवर माघारी धाडले आणि भारताला पहिला धक्का दिला.

14:36 (IST)22 Jun 2019
नाणेफेक जिंकून भारताची प्रथम फलंदाजी, शमीला संधी

भारताचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. जायबंदी भुवनेश्वर कुमारच्या जागी संघात मोहम्मद शमीला संधी देण्यात आली आहे. अष्टपैलू विजय शंकरदेखील दुखापतग्रस्त होता, मात्र तो सामन्याआधी तंदुरुस्त झाल्यामुळे त्याचे संघातील स्थान कायम आहे.

======================