२०१९ विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माने आपला धडाकेबाज फॉर्म कायम ठेवला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यातही आक्रमक खेळी केली. सलामीवीर शिखर धवनसोबत रोहितने शतकी भागीदारी करत संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली आहे. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये चाचपडत खेळणाऱ्या रोहित शर्मा आणि शिखर धवनने मैदानात स्थिरावल्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यादरम्यान रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनीला मागे टाकलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने धोनीला मागे टाकलं आहे. धोनीच्या नावावर आतापर्यंत ३५४ षटकार जमा आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात षटकार खेचत रोहितने धोनीला पिढाडीवर टाकलं आहे. यादरम्यान रोहित आणि शिखर या दोघांनीही आपली अर्धशतकं पूर्ण केली. दरम्यान रोहित शर्मा ५७ धावा काढून कुल्टर-नाईलच्या गोलंदाजीवर माघारी परतला.