News Flash

World Cup 2019 : असाच आत्मविश्वास ठेऊन पुढे वाटचाल करा, सचिनचा भारतीय संघाला सल्ला

भारताची आफ्रिकेवर ६ गडी राखून मात

रोहित शर्माची आक्रमक शतकी खेळी आणि गोलंदाजीत युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराहने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवला. आफ्रिकेवर ६ गडी राखून मात करत भारताने विश्वचषक स्पर्धेची मोठ्या धडाक्यात सुरुवात केली आहे. या विजयी कामगिरीनंतर भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरनेही भारतीय संघाचं कौतुक केलं असून, असाच आत्मविश्वास ठेऊन पुढे वाटचाल करण्याचा सल्लाही दिला आहे.

अवश्य वाचा – जाणून घ्या धोनीच्या ग्लोव्ह्जवरील या चिन्हाचा अर्थ, तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल

“विश्वचषकात पहिला सामना जिंकणं ही नेहमी आनंद देणारी भावना असते. तुमची सुरुवात योग्य पद्धतीने झाली असल्याचं हे दिसून येतं. सध्या ड्रेसिंग रुममध्ये आनंदाचं वातावरण असणार आहे. आता पहिला सामना संपला आहे, त्यामुळे हाच आत्मविश्वास कायम ठेऊन पुढच्या सामन्यात मैदानात उतरा असा सल्ला मी भारतीय संघाला देईन.” सचिन India Today वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

अवश्य वाचा – World Cup 2019 : न्यूझीलंडच्या विजयात ट्रेंट बोल्टची विक्रमी कामगिरी

दक्षिण आफ्रिकेचा या स्पर्धेतला हा सलग तिसरा पराभव ठरला आहे. पहिल्या सामन्यात यजमान इंग्लंड, त्यानंतर बांगलादेश आणि आता भारताकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भारताची या स्पर्धेत पुढची लढत ९ जूनरोजी माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. त्यामुळे या लढतीत कोणता संघ बाजी मारतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – World Cup 2019 : रोहितची आतापर्यंत सर्वोत्तम खेळी, कर्णधार विराट कोहलीकडून कौतुक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2019 12:00 pm

Web Title: icc cricket world cup 2019 ind vs sa pack the confidence into your kit back and move on says sachin tendulkar to team india
टॅग : Sachin Tendulkar
Next Stories
1 जाणून घ्या धोनीच्या ग्लोव्ह्जवरील या चिन्हाचा अर्थ, तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल
2 World Cup 2019 : न्यूझीलंडच्या विजयात ट्रेंट बोल्टची विक्रमी कामगिरी
3 World Cup 2019 : रोहितची आतापर्यंत सर्वोत्तम खेळी, कर्णधार विराट कोहलीकडून कौतुक
Just Now!
X