22 October 2020

News Flash

‘भारताशी हरल्यानंतर माझ्या नावाचा बोभाटा’; ABD चा खुलासा

संघात पुनरागमन करण्यासाठी कोणावरही दबाव टाकला नसल्याचेही डिव्हिलियर्सने म्हटले आहे

विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अत्यंत खराब कामगिरी केली. साखळी फेरीतील एकूण ९ सामन्यात त्यांना केवळ ३ सामन्यात विजय मिळवता आला. त्यातही पहिले ३ सामने आफ्रिकेने गमावले. बांगलादेशसारख्या तुलनेने दुबळ्या संघाकडून दक्षिण आफ्रिकेला पराभवाची चव चाखावी लागली. त्यातून सावरण्याआधीच भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले. तो दक्षिण आफ्रिकेचा स्पर्धेतील सलग तिसरा पराभव ठरला. दक्षिण आफ्रिकेचा तिसरा पराभव झाल्यानंतर अचानक माजी खेळाडू एबी डिव्हिलयर्स याला संघात पुनरागमन करायचे होते, असे वृत्त दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाकडून देण्यात आले होते. याबाबत डिव्हिलियर्सने मौन पाळले होते, पण अखेर डिव्हिलियर्सने आज यावर मौन सोडले.

“मी निवृत्ती स्वीकारल्यानंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाच्या संपर्कात अजिबात नव्हतो. त्यांनीही मला कधी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. माझा शाळकरी मित्र फाफ डू प्लेसिस याच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेचा संघ उत्तम कामगिरी करत होता. विश्वचषक स्पर्धेसाठी संघ जाहीर होण्याच्या २ दिवस आधी मी फाफशी संपर्क साधला, त्यावेळी त्याने मला काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नाची उत्तर देताना ‘जर संघाला गरज असेल तर आणि तरच मी संघासाठी उपलब्ध आहे’, असे उत्तर मी दिले. याबाबत पुढे काहीही चर्चा झाली नाही. पण भारताविरुद्ध स्पर्धेतील सलग तिसरा पराभव पत्करावा लागल्यानंतर अचानक माझ्या नावाचा बोभाटा होऊ लागला. काही लोकांनी दक्षिण आफ्रिका संघाच्या कामगिरीवर होणाऱ्या टिकेवरून लक्ष विचलित करण्यासाठी माझ्या नावाचा वापर केला. पण मी संघात पुनरागमन करण्यासाठी कोणावरही जबरदस्ती केली नाही”, असे स्पष्टीकरण डिव्हिलियर्सने दिले.

“माझ्या निवृत्तीचा निर्णय आर्थिक हेतूने नव्हता. मला माझ्या कुटुंबाला आणि मुलाला वेळ द्यायचा होता. निवृत्त झाल्यानंतर मी कुटुंबाला वेळ देण्यात बराच यशस्वी झालो. पण भारताशी सामना पराभूत झाल्यानंतर माझ्या नावाचा उगाच बोभाटा करण्यात आला. माझ्या निवृत्तीला वेगळाच रंग देण्यात आला. पण माझा हेतू शुद्ध होता”, असा खुलासाही त्याने केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 6:48 pm

Web Title: icc cricket world cup 2019 india south africa ab de villiers retirement comeback proteas vjb 91
Next Stories
1 WC 2019 : स्पर्धेतील कामगिरीबद्दल BCCI विचारणार विराट, रवी शास्त्रींना जाब
2 पाकिस्तानी मंत्र्याने केले धोनीचा अपमान करणारे ट्विट, म्हणाला…
3 WC 2019 : फायनलमध्ये खेळू अशी कल्पनाही केली नव्हती – मॉर्गन
Just Now!
X