News Flash

World Cup 2019 : पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना पावसामुळे रद्द

दोन्ही संघांना समान गूण

२०१९ विश्वचषकात ब्रिस्टॉलच्या मैदानावर होणारा पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द झाला आहे. ब्रिस्टॉलच्या मैदानावर सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे नाणेफेकीसाठी उशीर झाला. पावसाचा जोर थांबेल असा अंदाज व्यक्त केला जात होता, याप्रमाणे काही तासांनंतर पावसाचा जोर थांबला.

यानंतर मैदान आणि खेळपट्टीची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मैदानावरील पाणी हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र सलग पडणाऱ्या पावसामुळे त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं नाही. अखेरीस दोन्ही पंचांनी कर्णधारांशी बोलून सामना रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. दोन्ही संघाना समान गूण बहाल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2019 9:00 pm

Web Title: icc cricket world cup 2019 match between pak vs sl abandoned due to rain psd 91
Next Stories
1 World Cup 2019 : ग्लोव्ह्जच्या वादावर आता पडदा टाका – कपिल देव
2 क्रिकेटला भारतीय राजकारणाचा फड बनवू नका ! धोनी ग्लोव्ह्ज वादावर पाक मंत्र्यांचं वक्तव्य
3 World Cup 2019 : रोहित शर्माचा चांगला फॉर्म कर्णधार विराट कोहलीसाठी फायदेशीर !
Just Now!
X