अफगाणिस्तान विरुद्धच्या विश्वचषक सामन्यात बांगलादेशच्या संघाने प्रथम फलंदाजी २६२ धावा केल्या. मुशफिकूर रहीम (८३) आणि शाकिब अल हसन (५१) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर बांगलादेशने अफगाणिस्तानला २६३ धावांचे आव्हान दिले.

सामन्यात शाकिबने अर्धशतक ठोकले. या सोबतच आव्हानाचा पाठलाग करताना शाकिब अल हसनच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर बांगलादेशने अफगाणिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. शाकिबने गुलबदिन नैब, रहमत शाह, अफगाण, मोहम्मद नबी आणि नजीबुल्लाह अशा ५ फलंदाजांना माघारी धाडले. एकाच सामन्यात अर्धशतकी खेळी आणि ५ गडी मिळवणारा शाकिब अल हसन हा या विश्वचषक स्पर्धेतील आतापर्यंतचा एकमेव खेळाडू ठरला. या आधी २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या युवराज सिंगने आयर्लंड संघाविरुद्ध हा कारनामा केला होता. पण त्यानंतर आतापर्यंत हा पराक्रम करणारा शाकिब हा एकमेव खेळाडू ठरला आहे.

महत्वाचे म्हणजे हे दोघेही डावखुरे फलंदाज आणि डावखुरे फिरकीपटू आहेत.

फलंदाजीतही शाकिबने आपली कमाल दाखवली. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम बांगलादेशला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. बांगलादेशच्या डावाची सुरुवात फारशी सुरुवात फारशी चांगली झाली नाही. १७ धावांवर लिटन दास माघारी परतला. त्याने केवळ २ चौकार लगावले. तमिम इकबालने शाकिब अल हसनच्या साथीने चांगली खेळी केली. त्या दोघांमध्ये ५९ धावांची भागीदारी झाली. पण बॅकफूटवर येऊन फटका मारताना तो नबीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने ३६ धावा केल्या. शाकिब अल हसनने मात्र आपला फॉर्म कायम राखत अर्धशतक झळकावले. पण दुर्दैवाने ५१ धावांवर खेळताना तो पायचीत झाला. शाकिबने केवळ १ चौकार लगावला. मुशफिकूर रहीम आणि शाकिब यांच्यात ६१ धावांची भागीदारी झाली.