16 January 2021

News Flash

WC 2019 IND vs WI : बुमराहच्या यॉर्करची ख्रिस गेलला धडकी, म्हणाला…

बुमराहचे ४ सामन्यात ७ बळी

भारतीय वेगवान गोलंदाजीचा कणा म्हणून सध्या जसप्रित बुमराहकडे पाहिले जाते. बुमराहने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत आपली छाप उमटवली आहे. भारताने खेळलेल्या ४ सामन्यात बुमराहने ७ बळी टिपले आहेत. तसेच महत्वाच्या क्षणी भेदक मारा करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. आता भारताचा पुढचा सामना विंडीजच्या संघाशी होणार आहे. पण या सामन्याआधीच ख्रिस गेलला बुमराहच्या यॉर्करची धडकी भरली आहे.

ख्रिस गेल

BCCI ने बुमराहवरील एक छोटीशी डॉक्युमेंट्री ट्विट केली आहे. या मुलाखतीमध्ये ख्रिस गेलने देखील बुमराहबद्दल मत व्यक्त केले आहे. यात बोलताना गेल म्हणाला की बुमराह हा अत्यंत भेदक मारा करून शकतो. तो चेंडू चांगला स्विंग करू शकतो. त्याचा यॉर्कर चेंडूदेखील दमदार असतो. चांगल्या वेगाने गोलंदाजी करतो. जे x फॅक्टर गोलंदाजामध्ये असणे आवश्यक असतात, ते सारे काही बुमराहच्या गोलंदाजीत आहे. त्याची गोलंदाजीची शैली वेगळी आहे. त्याचा त्याला गोलंदाजीत नेहमीच फायदा होता.

पहा Video : …म्हणून यॉर्कर टाकायला मला अधिक आवडतं – बुमराह

याच व्हिडिओत बुमराहने देखील अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यॉर्कर चेंडू अतिशय भेदकपणे कसा टाकता येतो, याचेही त्याने यावेळी उत्तर दिले. “मी लहानपणी अंगणात खेळायचो, तेव्हा मी कायम यॉर्क चेंडू टाकायचो. मला फारसे समजत नसतानाही मी यॉर्कर चंदू टाकण्याचाच सराव करत असायचो. याचे कारण म्हणजे टीव्हीवर मी जेव्हा क्रिकेटचे सामने पाहायचो तेव्हा त्यात एक गोष्ट मला जाणवायची ती म्हणजे गोलंदाजाने यॉर्कर चेंडू टाकला की फलंदाज निरुत्तर होतो आणि गोलंदाजाला यश मिळते. त्यामुळे माझ्या मनात असे समीकरणच तयार झाले की यॉर्कर चेंडू टाकले तरच बळी मिळतो. तेव्हापासून मी यॉर्कर चेंडूचा सराव करतो आहे. म्हणूनच माझं यॉर्कर चेंडूवर अतिशय प्रेम आहे”, असे बुमराहने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 3:42 pm

Web Title: icc cricket world cup 2019 team india jasprit bumrah yorker chris gayle bcci vjb 91
Next Stories
1 World Cup 2019 : या धोनीचं करायचं काय? टीम इंडियाच्या मॅनेजमेंटसमोर गहन प्रश्न
2 Video : एकदम ‘झेल’क्लास क्षेत्ररक्षण! सांगा तुम्हाला आवडलेला कॅच…
3 World Cup 2019 : …म्हणून यॉर्कर टाकायला मला अधिक आवडतं – बुमराह
Just Now!
X