16 January 2021

News Flash

World Cup 2019 : विराट कोहली आधुनिक युगाचा येशू!

इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने व्यक्त केलं मत

भारतीय संघ इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धा खेळत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आतापर्यंत स्पर्धेत ५ सामने खेळले. त्यातील १ सामना पावसामुळे रद्द झाला. पण इतर चारही सामन्यात भारताने यश मिळवले. त्यामुळे भारताचे सध्या ५ सामन्यात ९ गुण आहेत. विराट कोहली आपले कर्णधारपद उत्तमरीत्या भूषवत असून तो आधुनिक युगातील येशू आहे, असे मत इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅम स्वान याने व्यक्त केले आहे.

“बाद झाल्यावर जो फलंदाज मैदानातून बाहेर जायला तयार नसतो, तो फलंदाज मला अजिबात आवडत नाही. मी अनेकदा या विषयावर फलंदाजांशी चर्चा केली आहे. मैदानावरील पंचांनी तुम्हाला बाद घोषित करेपर्यंत तुम्ही मैदानात उभे राहायला हवे. खेळाडू बाद आहे की नाही हे सांगणे पंचाचे कर्तव्य आहे, असे अनेक फलंदाजांची म्हणणे असल्याचे दिसले. जर तुमच्या बॅटला लागून चेंडू झेलला गेला आहे, तुम्हाला देखील ती गोष्ट माहिती आहे आणि तरीदेखील तुम्ही मैदानातच उभे आहात. मी पंचांच्या निर्णयाची वाट पाहत होतो असे तुम्ही म्हणत आहात तर ती शुद्ध फसवणूक आहे. महत्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःला फसवत आहेत असे मला वाटते.

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली पंचांनी बाद घोषित करण्याआधीच मैदान सोडून माघारी परतला. त्याला तंबूत परतल्यावर समजले की चेंडू बॅटला लागलाच नव्हता. पण विराट हा इतका प्रामाणिक ठरला की बाद नसतानाही तो मैदानातून बाहेर निघून गेला.त्याने स्वतःलाच बाद ठरवले आणि तो माघारी परतला. त्यामुळे विराट हा आधुनिक काळातील येशू आहे, असे तो म्हणाला.

काय होते प्रकरण –

पाक विरुद्धच्या सामन्यात मोहम्मद आमिरच्या गोलंदाजीवर विराट कोहली ७७ धावांवर खेळत होता. त्यावेळी आमिरने १ बाऊन्सर चेंडू फेकला. त्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या उद्देशाने विराटने बॅट फिरवली पण त्याचा फटका फसला. त्यानंतर पाकिस्तानच्या संघाने अपील केले. यात महत्वाचे म्हणजे पंचांनी त्याला बाद ठरवण्याच्या आधीच तो माघारी परतला. याहून आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे स्निको मीटरमध्ये चेंडू विराटच्या बॅटला स्पर्श न करता गेल्याचे दिसून आले.

हा पहा व्हिडीओ –

विराट स्वतःहून मैदान सोडून निघून गेल्यामुळे अनेक चाहत्यांनी नाराजी दर्शवली. इतकेच नव्हे तर ड्रेसिंग रूममध्ये गेल्यावर विराटला त्याची चूक लक्षात आली आणि त्याने पश्चात्ताप केला.

हा पहा व्हिडीओ –

दरम्यान, त्या सामन्यात भारताला ८९ धावांनी विजय मिळाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 9:23 am

Web Title: icc cricket world cup 2019 team india virat kohli england graeme swann jesus vjb 91
Next Stories
1 पाकिस्तानवरील संकट कायम
2 ड्रोनच्या नजरेतून : वेगाला मर्यादा!
3 सीमारेषेबाहेर : डा वी  आ घा डी !
Just Now!
X