27 February 2021

News Flash

Video : … अन क्रिकेटरसिकांच्या काळजाचा ठोका चुकला

चेंडू हेल्मेटला न जुमानता थेट त्याच्या हनुवटीवर लागला आणि तो रक्तबंबाळ झाला...

विश्वचषक स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानला जाणारा भारतीय संघ पहिल्या उपांत्य फेरीत पराभूत झाला. न्यूझीलंडने अटीतटीच्या स्पर्धेत भारताला १८ धावांनी मात दिली. तशीच काहीशी अवस्था दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाची झालेली दिसून आली. पण त्यापेक्षाही चर्चेची आणि काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना सामन्यात घडली.

ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणारा डेव्हिड वॉर्नर, कर्णधार आरोन फिंच आणि पीटर हँड्सकॉम्ब या तीन फलंदाजांनी उपांत्य फेरीच्या सामन्यात मात्र ऑस्ट्रेलियाची पार निराशा केली. सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून फिंचने फलंदाजी स्वीकारली. आव्हानाचा पाठलाग करण्याचे दडपण कमी करण्याच्या उद्देशाने ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात होते. त्यानंतर वॉर्नरने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. पण त्यानंतर मात्र इंग्लंडने दमदार पुनरागमन केले.

ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद १४ असताना अलेक्स कॅरी मैदानात आला. त्यालाही लवकर बाद करण्याच्या उद्देशाने जोफ्रा आर्चरने त्याला उसळता चेंडू टाकला. पण महत्वाचे म्हणजे हा चेंडू थेट त्याच्या हेल्मेटला न जुमानता हनुवटीवर लागला आणि कॅरीला दुखापत होऊन तो रक्तबंबाळ झाला.

तो रक्तबंबाळ झाला असला तरीही त्याने धीर सोडला नाही. प्रथमोपचार घेऊन तो पुन्हा मैदानावर खेळण्यासाठी उभा राहिला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या डावात इंग्लंडचा हुकुमी एक्का जोफ्रा आर्चर याने आपल्या गोलंदाजीच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार फिंचला बाद केले. जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार फिंच शून्यावर बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. पंचांच्या निर्णयावर फिंचने रिव्ह्यू घेतला मात्र तिसऱ्या पंचांनीही त्याला बाद ठरवले. त्यानंतर वॉर्नरने एक चौकार खेचत ऑस्ट्रेलियावरील दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. पण उसळत्या चेंडूवर बॅटची कड लागून वॉर्नरदेखील बाद झाला. ज्या प्रमाणे रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे जण भारतीय फलंदाजीचा कणा असूनही झटपट बाद झाले, अगदी तसेच वॉर्नर आणि फिंच माघारी परतले. त्यानंतर पुढील गडी डाव सांभाळतील, अशी अपेक्षा लोकेश राहुल प्रमाणेच पीटर हँड्सकॉम्बदेखील लवकर बाद झाला. त्यामुळे भारताच्या डावाचेच पुनःप्रक्षेपण चालू आहे की काय अशी चर्चा काही काळ रंगलेली पाहायला मिळाली. पण अखेर ऑस्ट्रेलियाला स्टीव्ह स्मिथ आणि अलेक्स कॅरी यांनी सावरले. या दोघांनी अत्यंत सावध खेळी करत १६ व्या षटकात संघाला पन्नाशी गाठून दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2019 5:18 pm

Web Title: icc cricket world cup 2019 video alex carry ball hit chin blood helmet vjb 91
Next Stories
1 भारताच्या पराभवानंतर सपोर्ट स्टाफमधील दोघांचा राजीनामा
2 AUS vs ENG Semi Final : ऑस्ट्रेलियाचे फलंदाज भारताच्या वाटेवर
3 योगराज सिंह यांची धोनीवर टीका, अंबाती रायुडूला निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती
Just Now!
X