News Flash

Video : फिल्डिंगमधलं भन्नाट ‘फुटवर्क’! कर्णधार होल्डरने ‘असा’ अडवला चौकार

फलंदाजीत फुटवर्क महत्वाचे असतेच, पण होल्डरने क्षेत्ररक्षणातील फुटवर्क दाखवून दिले

भारत आणि विंडीज यांच्यात होणाऱ्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या दोघांनी अत्यंत संथ सुरुवात करून पहिले ५ षटके खेळून काढली. त्यानंतर जेव्हा रोहित शर्माने फटकेबाजीचा प्रयत्न केला. त्यावेळी षटकात दमदार फटकेबाजी केल्यानंतर शेवटच्या चेंडूवर केमार रोचने बळी टिपला. भारताचा रोहित शर्मा १ चौकार आणि १ षटकार खेचून १८ धावांवर माघारी परतला. त्याला ज्या पद्धतीने बाद देण्यात आले त्यावरून चर्चा रंगली. पण त्याच बरोबर सामन्यात कर्णधार जेसन होल्डर याने क्षेत्ररक्षणात केलेले ‘फुटवर्क’देखील चर्चेचा विषय ठरला.

फलंदाजी करताना फलंदाजाचे फुटवर्क महत्वाचे असते. त्याच्या फुटवर्कवर तो किती चांगला खेळ करू शकेल हे ठरते. पण विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने क्षेत्ररक्षणातील फुटवर्क दाखवले. ८ व्या षटकात शेवटच्या चेंडूवर केमार रोचने राहुलला चेंडू टाकला. त्याने तो चेंडू टोलवला. पण जेसन होल्डरने अत्यंत चतुरपणे तो चेंडू सीमारेषेच्या आत रोखला. या वेळी त्याने पायाचा वापर करून १ धाव रोखली.

भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहण्याची कामगिरी केली आहे. पाच सामन्यांत चार विजय मिळवून भारताने उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच केली आहे. मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्डवर होणाऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ भारताचा विजयरथ रोखणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांसारख्या बलाढ्य संघांचे आव्हान सहज परतवून लावल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात विजयासाठी अक्षरश: झुंजावे लागले होते. महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधवच्या संथ फलंदाजीवर सर्वांनीच टीका केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 4:49 pm

Web Title: icc cricket world cup 2019 video jason holder fielding ball stop leg footwork vjb 91
Next Stories
1 World Cup 2019 IND vs WI : भारत अजिंक्यच! कॅरेबियन वादळ मात्र शमलं…
2 World Cup 2019 : एका शतकी खेळीमुळे बाबर आझमचं नाव दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत
3 World Cup 2019 : धोनीची चिंता करु नका, आम्ही त्याच्याशी बोलत आहोत !
Just Now!
X