21 November 2019

News Flash

World Cup 2019 : शिखरच्या अनुपस्थितीत विजय शंकरला संघात संधी?

सहायक प्रशिक्षक बांगर यांचे संकेत

सलामीवीर शिखर धवन अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे सध्या विश्वचषक स्पर्धेतून काहीकाळ बाहेर गेला आहे. पहिले दोन सामने जिंकणाऱ्या भारतीय संघासमोर पुढच्या सामन्यात न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. या सामन्यात कोणत्या खेळाडूला संघात जागा मिळेल यावरुन सध्या अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. त्यामुळे शिखर धवनच्या अनुपस्थितीत अष्टपैलू विजय शंकरला संघात जागा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय संघाचे सहायक प्रशिक्षक संजय बांगर यांनी असे संकेत दिले आहेत.

“आम्ही शिखरच्या दुखापतीवर लक्ष ठेऊन आहोत. डॉक्टरांची टीम त्याची काळजी घेत आहे. दुखापतीमधून सावरायला त्याला किमान १० ते १२ दिवस लागतील. यादरम्यानच्या काळात गरजेनुसार विजय शंकरचा विचार केला जाऊ शकतो. ऋषभ पंतही काही दिवसांत मँचेस्टरमध्ये असेल. संघात प्रत्येक खेळाडूला पर्याय असणं कधीही चांगलं असतं.” बांगर एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत होते.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर शिखर धवनच्या अंगठ्यावर चेंडू आदळला. त्यामुळे अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे शिखर संघाबाहेर गेलाय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात शतकी खेळी करत शिखरने संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला होता. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात भारतीय संघ कोणत्या खेळाडूला संघात जागा देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

First Published on June 12, 2019 5:38 pm

Web Title: icc cricket world cup 2019 vijay shankar can be use if required says assistant coach sanjay bangar psd 91
Just Now!
X