News Flash

World Cup 2019 : विंडीजचं ‘टेन्शन’ वाढलं! तडाखेबाज रसल विश्वचषकातून बाहेर

सततच्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे घेतली स्पर्धेतून माघार

विंडीजविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंडने अवघ्या ५ धावांनी निसटता विजय मिळवला. या विजयासोबतच किवी संघाने विश्वचषकातील पाचव्या विजयाची नोंद केली आणि पुढील फेरीसाठीची आपली दावेदारी अधिक भक्कम केली. तर या पराभवामुळे विंडीजच्या वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीत दाखल होण्याच्या आशा धुसर झाल्या. या बरोबरच विंडीजला आणखी एक धक्का बसला.

विंडीजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसल हा दुखापतीच्या कारणास्तव विश्वचषक स्पर्धेतून बाहेर गेला आहे. त्याच्या जागी सुनील अम्ब्रीस याला संघात स्थान देण्यात आले आहे. रसलच्या गुडघ्याच्या दुखापतीने उचल खाल्ल्यामुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. या स्पर्धेत रसलने फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. पाक विरुद्धच्या साम्ण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही सामन्यात त्याला आपला ठसा उमटवता आला नव्हता.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात देखील तो शून्यावर बाद झाला होता. त्या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण विंडजने दिलं. केन विल्यमसन १४८ धावा आणि रॉस टेलर ६९ धावा यांच्या बळावर न्यूझीलंडने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी २९२ धावांचे आव्हान दिले होते. न्यूझीलंडने दिलेल्या २९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. शाय होप आणि निकोलस पूरन सुरूवातीलाच बाद झाले. पण, सलामीला उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने आक्रमक खेळी करत ८४ चेंडूत ८७ धावा केल्या, त्याला हेटमायरने चांगली साथ दिली आणि ५४ धावा केल्या. नंतर ख्रिस गेल आणि सिमरॉन हेटमायरच्या झंझावाती फलंदाजीनंतर मधली फळी कोलमडली.

तुफानी शतकी खेळी करताना कार्लोस ब्रेथवेटने मात्र लढतीत रंगत आणली. ब्रेथवेटने ९ चौकार आणि ५ उत्तुंग षटकारांच्या सहाय्याने ८२ चेंडूंमध्ये १०१ धावांची तुफानी खेळी केली. त्याने एका बाजूने खिंड लढवत शानदार शतकी खेळी केली आणि वेस्ट इंडिजला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं. सात चेडूंमध्ये पाच धावांची आवश्यकता असताना त्याने विजयी षटकार मारण्याच्या प्रयत्न केला पण चेंडू ट्रेंट बोल्टने सीमारेषेनजीक टिपला आणि न्यूझीलंडने पाच धावांनी विजय मिळवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2019 9:10 pm

Web Title: icc cricket world cup 2019 west indies andre russell out of wc 2019 sunil ambris in team vjb 91
Next Stories
1 World Cup 2019 : शाकिबचा ‘एक हजारी’ कारनामा! रचला नवा इतिहास
2 WC 2019 BAN vs AFG : बांगलादेशच्या विजयात शाकिब चमकला; अफगाणिस्तानवर केली मात
3 World Cup 2019 : इंग्लंडला मोठा धक्का! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याला ‘हा’ खेळाडू मुकणार
Just Now!
X