News Flash

वेस्ट इंडिज देश नाही, राष्ट्रगीतावेळी वाजवलं जातं ‘हे’ गाणं

वेस्ट इंडिजची टीम वर्ल्डकपमध्ये खेळत असली तरी तो एका देशाचा संघ नाहीय.

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत सामना सुरु होण्याआधी प्रत्येक देशाचं राष्ट्रगीत वाजवलं जातं. वेस्ट इंडिजची टीम वर्ल्डकपमध्ये खेळत असली तरी तो एका देशाचा संघ नाहीय. कॅरेबियन प्रदेशात विविध बेटे आहेत. त्या बेटांनी मिळून वेस्ट इंडिजचा संघ तयार झाला आहे. वेस्ट इंडिज म्हणजे अनेक देशांचे मिळून कॉन्फिडरेशन संघराज्य आहे.

वेस्ट इंडिज हा एक देश नसल्यामुळे त्यांच्या सामन्याआधी कुठले राष्ट्रगीत वाजवले जाते असा प्रश्न काही क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो? वर्ल्डकपसह आयसीसीच्या स्पर्धांमध्ये वेस्ट इंडिजचा सामना सुरु होण्याआधी डेव्हिड रुडर यांचं ‘रॅली राऊंड द वेस्ट इंडिज’ हे गीत वाजवलं जातं. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने या गाण्याचा स्वीकार केला आहे.

डेव्हिड रुडर हे कॅरेबियन प्रदेशातील यशस्वी कलाकार आहेत. त्रिनिदाद येथे रहाणारे डेव्हिड रुडर यांनी १९८८ साली ‘रॅली राऊंड द वेस्ट इंडिज’ हे गाणे लिहून संगीतबद्ध केले आहे. या गाण्यामध्ये वेस्ट इंडिज क्रिकेटच्या सर्व भावना असल्यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने राष्ट्रगीताच्या जागी या गाण्याचा स्वीकार केला. या गाण्यामध्ये वेस्ट इंडिज क्रिकेटच्या गौरवशाली इतिहासाच वर्णन आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू मायकेल होल्डिंग यांचाही गाण्यामध्ये उल्लेख आहे. गाण्यामधून लोकांना एकत्र येऊन वेस्ट इंडिज क्रिकेटच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सुरुवातीला वेस्ट इंडिजचा कर्णधार ज्या बेटाचा असायचा तिथलं राष्ट्रगीत वाजवलं जायचं. पण नंतर ही पद्धत बंद झाली.

राष्ट्रध्वजाच्या जागी बोधचिन्ह

वेस्ट इंडिज देश नसल्यामुळे राष्ट्रध्वज कोणता असा प्रश्नही तुम्हाला पडू शकतो. यावर वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने इनसिग्निआ तयार करुन तोडगा शोधला आहे. इनसिग्निआ म्हणजे बोधचिन्ह.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2019 9:48 am

Web Title: icc cricket world cup 2019 west indies national anthem dmp 82
Next Stories
1 हॅटट्रीकनंतर शमीच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, ‘माझी इतकीच इच्छा की…’
2 बांगलादेशला विजय आवश्यक आज अफगाणिस्तानशी सामना
3 हॅट्ट्रिकवीर!
Just Now!
X