अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेनंतर वेस्ट विंडिज संघाचे विश्वषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. गुरूवारी भाराताविरोधात झालेल्या दारूण पराभवानंतर विंडिजच्या आपेक्षावर पाणी फिरले. भारताने विंडिजचा १२५ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीकडे कूच केली आहे.

विश्वचषक स्पर्धा सध्या अंतिंम टप्यात पोहचली असून गुणतालिकेवर नजर टाकल्यास विंडिजचा संघ सध्या फक्त तीन गुणांसह आठव्या स्थानावर आहे. दोन वेळच्या विश्वचषक विजेत्या विंडिज संघाला सात सामन्यात फक्त एक विजय मिळवता आला आहे तर एक सामना पावसाने धुतला गेल्यामुळे एक गुण मिळाला आहे. या विश्वचषकातील विंडिच्या संघाचे आव्हान संपल्यात जमा आहे. उर्वरीत दोन्ही सामन्यात विंडिज संघाने विजय मिळवला तरी त्यांना उपांत्य फेरीत पोहोचता येणार नाही. त्यामुळे अखेरचे दोन्ही सामने जिंकून विंडिज संघ स्पर्धेचा शेवट गोड करणार का? हे पाहण्याजोगे ठरेल.

अखेरच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवून स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न विंडिजचा संघ नक्कीच करेल. विंडिजचे अखेरचे दोन सामने श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघाबरोबर आहेत. अफगाणिस्तान संघाचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आले आहे. मात्र विंडिजच्या संघाने पराभव केल्यास श्रीलंकेचे आव्हानही संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे बेभरोशाच्या विडिंज संघ श्रीलंकेसाठी धोकादायक ठरू शकतो.