News Flash

सट्टेबाजीसाठी शाकीबशी संपर्क साधणाऱ्या संघ मालकावर ICC कडून बंदी

स्पर्धेचा आधार घेऊन बांगलादेशच्या खेळाडूंची मिळवत होता माहिती

बांगलादेशचा सर्वात अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याच्यावर २९ ऑक्टोबर २०१९ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) कडून दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली. ICC च्या लाचलुचपत प्रतिबंधक नियमावलीचा भंग केल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई झाली. याच प्रकरणी आता ICC ने आणखी एकाला दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी १० लीग स्पर्धांमध्ये एका संघाचा मालक असलेल्या दीपक अग्रवालवर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई केली आहे.

“बुमराह अजूनही ‘बच्चा’ आहे” म्हणणारा पाकिस्तानी क्रिकेटर आता म्हणतो…

कॅनडामधील टी १० लीग स्पर्धेत सिंधीज या संघाची मालकी दोन वर्षांसाठी दीपक अग्रवाल याच्याकडे होती. मॅच फिक्सिंग प्रकरणात शाकीबला स्वत:हून माहिती न दिल्याने दोषी ठरवण्यात आले होते. त्याची चौकशी करताना दीपक अग्रवाल याचे नाव या प्रकरणात समोर आले. त्यानंतर दीपक अग्रवालने चौकशी दरम्यान त्याच्यावरील ICC च्या आचारसंहितेचा भंग केल्याचे आरोप मान्य केले. त्यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली असून त्यातील सहा महिने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

रोहितचा २६४ धावांचा विक्रम कोण मोडणार? श्रीसंतने दिलं उत्तर

मिळालेल्या माहितीनुसार, स्पर्धेच्या माध्यमातून दीपक अग्रवालने शाकीब अल हसनशी अनेक वेळा संपर्क साधला. शाकीबशी चर्चा करताना दीपक अग्रवाल विविध मार्गाने बांगलादेशी क्रिकेटपटूंची माहिती काढण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून त्या माहितीचा फायदा सट्टेबाजी करताना होऊ शकेल. याशिवाय, दीपक अग्रवालवर पुरावे नष्ट करण्याचेही आरोप ठेवण्यात आले आहेत. विविध लोकांशी चॅटद्वारे बोलल्यानंतर त्याने त्या लोकांना चॅट डिलीट करण्यास सांगितल्यामुळे त्याच्यावर त्या प्रकारचे आरोप ठेवण्यात आले आहेत. आता २७ ऑक्टोबर २०२१ नंतरच दीपक अग्रवाल पुन्हा क्रिकेटशी संबंधित स्पर्धा आणि कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2020 1:51 pm

Web Title: icc hands a ban of two years on franchise owner deepak agarwal for contacting shakib al hasan in t10 league vjb 91
Next Stories
1 “बुमराह अजूनही ‘बच्चा’ आहे” म्हणणारा पाकिस्तानी क्रिकेटर आता म्हणतो…
2 लॉकडाउन स्पेशल… रोहितने भन्नाट कमेंट करत युवराजला केलं ट्रोल
3 कपिल देव आणि हार्दिक पांड्याची तुलना होऊच शकत नाही – अब्दुल रझाक
Just Now!
X