02 June 2020

News Flash

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा लांबणीवर?

‘आयसीसी’कडून लवकरच अधिकृत घोषणेची शक्यता

संग्रहित छायाचित्र

 

करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियात रंगणारी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून पुढील आठवडय़ापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) याविषयी अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

नियोजित वेळापत्रकानुसार १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान पुरुषांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा सातवा हंगाम खेळवण्यात येणार आहे; परंतु करोनाच्या संसर्गामुळे जगभरातील क्रिकेट स्पर्धा रद्द अथवा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विश्वचषकाबाबतीतही लवकरच निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

‘‘विश्वचषक पुढे ढकलण्यात येण्याचा निर्णय जवळपास पक्का झाला असून पुढील आठवडय़ात ‘आयसीसी’ आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या बैठकीत विश्वचषकाच्या लांबणीबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल,’’ असे ‘आयसीसी’च्याच विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

परंतु विश्वचषक पुढे ढकलण्यात आल्यास ‘आयसीसी’ आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियापुढे तीन पर्याय उपलब्ध असून त्यांपैकी ते कोणता पर्याय निवडतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. त्याचप्रमाणे विश्वचषक लांबणीवर पडल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यानचा काळ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ‘आयपीएल’च्या आयोजनासाठी वापरू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 3:00 am

Web Title: icc is expected to officially announce the twenty20 cricket world cup soon abn 97
Next Stories
1 क्रिकेटची गाडी रुळावर आणण्यासाठी आयसीसीकडून नियमावली जाहीर
2 BWF कडून नवीन वेळापत्रक जाहीर, डिसेंबर महिन्यात India Open चं आयोजन
3 आयपीएलचा तेरावा हंगाम दुबईत?? माजी भारतीय गोलंदाजाचा दावा
Just Now!
X