28 November 2020

News Flash

ICC च्या नियमांमध्ये बदल, टीम इंडियाने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतलं अव्वल स्थान गमावलं

ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रद्द झालेले सामने आणि परिस्थितीचा अंदाज घेता आयसीसीने आपल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या नियमांमध्ये बदल केला आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये मिळवलेल्या गुणांच्या सरासरीवरुन अंतिम फेरीतले दोन संघ निवडले जाणार आहेत.

आयसीसीने नियमात बदल केल्यानंतर भारतीय संघाने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतलं अव्वल स्थान गमावलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने सर्वोत्तम सरासरीच्या जोरावर भारताला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे.

सुरुवातीच्या सामन्यांमध्ये भारतीय संघाने आश्वासक कामगिरी केली होती. आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या ४ मालिकांमधून भारतीय संघाने ७ सामने जिंकत अव्वल स्थान मिळवलं होतं. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत झालेला पराभव हा भारताचा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतला एकमेव पराभव होता. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून या मालिकेत दोन्ही संघांमध्ये ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 9:58 pm

Web Title: icc made changes in test championship indian loose their top position psd 91
Next Stories
1 ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका अजिंक्य रहाणेसाठी असेल आव्हानात्मक – हरभजन सिंह
2 विश्वचषकात टी. नटराजन भारतीय संघासाठी ठरु शकतो X फॅक्टर – व्ही.व्ही.एस लक्ष्मण
3 Video: सॉरी वॉर्नर… डेव्हिड वॉर्नरच्या लेकीला आवडतो ‘हा’ क्रिकेटपटू
Just Now!
X