22 January 2021

News Flash

ICC च्या संघात भारतीयांचा बोलबाला; पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला स्थान नाही

तिन्ही संघामध्ये स्थान पटकावणारा विराट कोहली हा एकमेव खेळाडू

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीनं २०१० ते २०१० या दशकातील एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी संघाची घोषणा केली आहे. दशकातील सर्वोत्तम ११ खेळाडूंची आयसीसीनं निवड केली आहे. अभिमानाची बाब म्हणजे या तिन्ही संघाचं नेतृत्व भारतीय खेळाडूंकडे आहे. एकदिवसीय आणि टी-२० संघाचं कर्णधारपद धोनीकडे सोपवण्यात आलं आहे. तर कसोटी संघाच्या कर्णधारपदी विराट कोहली आहे.

आयसीसीनं निवडलेल्या तिन्ही संघात पाकिस्तान संघातील एकाही खेळाडूची वर्णी लागली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय आहे. तिन्ही संघामध्ये स्थान पटकावणारा विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे. विराट कोहलीला टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी संघात स्थान देण्यात आलं आहे.

दशकातील सर्वोत्तम टी२० संघ –
रोहित शर्मा, ख्रिस गेल, ऍरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिविलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), कायरन पोलार्ड, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.

दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय संघ –
रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिव्हिलिअर्स, शाकिब अल हसन, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, ट्रेन्ट बोल्ट, इम्रान ताहिर, लसिथ मलिंगा

कसोटी संघ –
अॅलिस्टर कूक, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, विराट कोहली(कर्णधार), स्टिव्ह स्मिथ, कुमार संगकारा (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, आर. अश्विन, बेन्ट स्टोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, जेस्म अँडरसन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2020 4:06 pm

Web Title: icc mens test t 20 and one day cricket team of the decade nck 90
Next Stories
1 रहाणेला सूर गवसला, चाहते झाले खुश… दिग्गजांनीही केलं कौतुक
2 मुंबईचा रहाणे मेलबर्नवर ‘अजिंक्य’
3 Ind vs Aus : रहाणे-जाडेजाच्या शतकी भागीदारीने भारत सामन्यात वरचढ
Just Now!
X