विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. २०१९ चं वर्ष गाजवल्यानंतर भारतीय संघाने नवीन वर्षाची सुरुवातही आक्रमक पद्धतीने केली. घरच्या मैदानावर श्रीलंकेला टी-२० मालिकेत तर ऑस्ट्रेलियाला वन-डे मालिकेत पराभवाचं पाणी पाजलं. यानंतर नवीन वर्षात पहिला परदेश दौरा करणाऱ्या भारतीय संघाने आपला हा फॉर्म न्यूझीलंडमध्येही कायम राखला, टी-२० मालिकेत यजमान न्यूझीलंडला ५-० ने पराभूत करत व्हाईटवॉश दिला.

अवश्य वाचा – ICC ODI Ranking : विराट-रोहितचं स्थान कायम

न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिकेत भारताला स्विकाराव्या लागलेल्या पराभवामागचं प्रमुख कारण हे जसप्रीत बुमराहला एकही विकेट न मिळणं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याच्या याच कामगिरीचा फटका आयसीसी क्रमवारीत बसलेला आहे, ट्रेंट बोल्टने बुमराहला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे, तर बुमराह दुसऱ्या स्थानावर घसरलेला आहे.

न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत बुमराहच्या शैलीचा अभ्यास करुन प्रतिस्पर्धी फलंदाज मैदानात उतरले होते असं वाटत होतं. चेंडू हातातून सोडताना त्याची ठेवण, टप्पा कुठे पडणार याचा अंदाज या सर्व गोष्टींचा अभ्यास करुन न्यूझीलंडच्या फलंदाजांनी बुमराहची गोलंदाजी खेळून काढली. या मालिकेत बुमराहने भलेही धावा कमी दिल्या असल्या तरीही त्याला विकेट न मिळणं हे भारतासाठी धोकादायक ठरलेलं आहे.

अवश्य वाचा – BLOG : या पराभवाची संघाला गरज होती !