09 July 2020

News Flash

ICC ODI Ranking : विराट कोहली-जसप्रीत बुमराहचं अव्वल स्थान कायम

ICC ने जाहीर केली क्रमवारी

भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराह आणि सध्याचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी आयसीसी वन-डे क्रमवारीतलं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. विश्वचषकानंतर झालेल्या विंडीज दौऱ्यानंतर भारतीय संघ एकही वन-डे सामना खेळलेला नाहीये, तरीही आपल्या आधीच्या कामगिरीच्या जोरावर दोन्ही भारतीय खेळाडूंनी आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे.

फलंदाजीत भारतीय कर्णधार विराट कोहली ८९५ गुणांसह पहिल्या तर रोहित शर्मा ८६३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या दोन फलंदाजांचा अपवाद वगळता शिखर धवन १९ व्या स्थानावर आहे. त्यामुळे भारतीय संघात इतर फलंदाजांची कामगिरी हा आगमी काळात चर्चेचा विषय ठरु शकतो.

दुसरीकडे गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने ७९७ गुणांसह आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. याव्यतिरीक्त फिरकीपटू कुलदीप यादव १२ व्या, युझवेंद्र चहल १४ व्या आणि भुवनेश्वर कुमार १५ व्या स्थानावर आहे. बांगलादेश दौऱ्यानंतर वेस्ट इंडिजच्या आगामी भारत दौऱ्यात भारत वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2019 10:28 am

Web Title: icc odi rankings virat kohli jasprit bumrah retain top spots psd 91
Next Stories
1 आता अजिंक्य रहाणेही म्हणतोय; मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन !
2 Video : जेव्हा इंदूरच्या रस्त्यांवर विराट कोहली ‘गली क्रिकेट’मध्ये रमतो
3 गुलाबी चेंडूला फटकावण्याची घाई करू नये!
Just Now!
X