द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात सुरु असलेल्या वादावर आज अखेर पडदा पडला. ICC ने PCB ला चांगलाच दणका दिला आहे. हा वाद बीसीसीआयने आधीच जिंकला होता. त्यानंतर बीसीसीआयने आयसीसीकडे न्यायालयीन वादात झालेल्या खर्चाची भरपाईची मागणी केली होती. यामध्येही पाक क्रिकेट बोर्डाचा पराभव झाला आहे. न्यायालयीन वादात बीसीसीआयला खर्चाच्या 60 टक्के रक्कम देण्याचा आदेश आयसीसीने पीसीबीला केला आहे. आयसीसीने दिलेल्या या आदेशामुळे पीसीबीचा पाय आणखी खोलात गेला आहे. आयसीसीने केलेल्या आदेशानुसार पीसीबीला बीसीसीआयला झालेला खर्च आणि व्यवस्थापकीय खर्च अशी मिळून 60 टक्के रक्कम द्यावी लागणार आहे.