टी २० विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या संघांची संख्या लवकरच १६ वरून २० इतकी होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) २०२३ ते २०३१ या काळात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपसाठी सहभागी संघांची संख्या वाढवण्याचा विचार केला जात आहे. क्रिकेटच्या खेळाची व्याप्ती वाढवण्यासाठी टी २० क्रिकेट हे प्रकार सर्वोत्तम माध्यम आहे, त्यामुळे टी २० क्रिकेट विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या संघांची संख्या वाढवण्याचा विचार ICC करत आहे.

IND vs AUS : विराट की स्मिथ… सर्वोत्तम कोण? गंभीर म्हणतो…

फुटबॉल आणि बास्केटबॉलप्रमाणेच क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्याचा ICC कडून प्रयत्न केला जात आहे. ‘टेलीग्राफ’च्या वृत्तानुसार २०२३ ते २०३२ या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वेळापत्रकात याचा विचार केला जाणार आहे. या काळातील पहिली टी २० विश्वचषक स्पर्धा २०२४ मध्ये होणार असून त्यात २० संघांमध्ये स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे.

Video : अरे देवा!! भर मैदानात अंपायरचं बघा काय चाललंय…

२०२४ च्या टी २० विश्वचषक स्पर्धेच्या प्रसारणाचे अधिकार देण्याआधी प्रत्येक वर्षी जागतिक पातळीवर एका स्पर्धेचे आयोजन केले जाईल. विश्वचषक स्पर्धांमध्ये संघांची संख्या वाढली तर दर्शकांची संख्याही अधिक होईल आणि त्याचा फायदा ICC ला होऊ शकेल. ICC आयोजित बड्या स्पर्धांमध्ये अमेरिकेसारख्या देशांना प्रतिनिधित्व मिळण्याची संधी असू शकेल. कारण अमेरिका ही खूप मोठी बाजारपेठ आहे, पण तेथे अद्यापही क्रिकेटचा तितका प्रसार झालेला नाही. अमेरिकेत क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी ICC अनेक प्रकारे प्रयत्न करत आहे. तसेच कॅनडा, जर्मनी, नेपाळ आणि नायझेरिया या देशांनाही T20 विश्वचषक स्पर्धेत संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.