News Flash

एकदिवसीय क्रिकेटमधून बॅटिंग पॉवर प्ले हद्दपार!

गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जाणारा बॅटिंग पॉवर प्ले एकदिवसीय क्रिकेटमधून हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीकडून (आयसीसी) घेण्यात आला आहे.

| June 27, 2015 12:07 pm

गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जाणारा बॅटिंग पॉवर प्ले एकदिवसीय क्रिकेटमधून हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीकडून (आयसीसी) घेण्यात आला आहे. त्याचबरोबर एकदिवसीय सामन्यांमधील क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा शिथिल होणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत शेवटच्या षटकांमध्ये फलंदाज या पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवताना दिसत होते. बार्बाडोस येथे सध्या सुरू असलेल्या आयसीसीच्या वार्षिक बैठकीत एकदिवसीय क्रिकेटमधील नव्या नियमांना मंजूरी देण्यात आली. येत्या ५ जुलैपासून एकदिवसीय सामन्यांसाठी हे नियम लागू होतील.

एकदिवसीय सामन्यांच्या नियमावलीत करण्यात आलेले महत्त्वपूर्ण बदल पुढीलप्रमाणे:
* पहिल्या १० षटकांमध्ये आता कॅचिंग पोझिशनवर क्षेत्ररक्षक ठेवणे अनिवार्य नाही.
* १५ ते ४० षटकांमध्ये आता बॅटिंग पॉवर प्ले नाही.
* ४१ ते ५० षटकांदरम्यान आता ३० यार्डांच्या वर्तुळाबाहेर आता चारऐवजी पाच क्षेत्ररक्षक ठेवण्याची मुभा.
* कोणत्याही नो-बॉलवर आता प्रतिस्पर्धी फलंदाजाला फ्री हिटची संधी देण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2015 12:07 pm

Web Title: icc scraps batting powerplay from odi cricket
टॅग : Icc
Next Stories
1 जागतिक हॉकी लीग : भारताने पाकिस्तानला बरोबरीत रोखले
2 सतनाम वाहे पुत्तर!
3 पेरूचा वारू झोकात!
Just Now!
X