आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधविरोधी नियमांमध्ये सुधारणा केली आहे. हे नियम जानेवारी २०१४मध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये सादर करण्यात येणार असून त्याबैठकीत स्वीकृती मिळाल्यास हे नियम लागू करण्यात येतील.
आयसीसीच्या दोन दिवसीय बैठकीमध्ये बांगलादेश प्रीमिअर लीग (बीपीएल) स्पर्धेच्या तपासात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. यानुसार नऊ जणांवर विविध आरोप निश्चित करण्यात आले आहेत. सात जणांवर सामनानिश्चिती संबंधित आरोप आणि कर्तव्याचे पालन न केल्याप्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले आहेत. यावेळी पाकिस्तानचा पाच वर्षे बंदी असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरविषयी चर्चा झाली. पण  नवीन नियम लागू झाल्यानंतर त्याचा विचार करण्यात येणार असल्याचे समजते.
ढाक्यामध्ये होणाऱ्या आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक २७ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहे.