आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यमसन एकमेकांचे कौतुक करताना दिसून आले. आयसीसीने विराट आणि केनच्या मैत्रीचा सुंदर व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला. या व्हिडिओत दोन्ही कर्णधारांनी त्यांच्या मैत्रीबद्दल सांगितले आहे. विराट कोहली आणि केन विल्यमसन यांच्यात जवळची मैत्री आहे. १९ वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेपासून हे दोन्ही एकमेकांना ओळखत आहेत.

केन विल्यमसनविषयी विराट कोहली म्हणाला, ”क्रिकेटमधील काही खेळाडूंशी मी अगदी जवळ आहे आणि केन विल्यमसन त्यापैकी एक आहे. आम्ही एकमेकांशी जोडलेले आहोत. क्रिकेट व्यतिरिक्त आम्ही एकमेकांना चांगलेच ओळखतो. ज्या प्रकारे आम्हा दोघांचा एकमेकांबद्दल आदर आहे, त्याच कारणामुळे आमची मैत्री चांगली आहे. केन विल्यमसनने आपल्या आयुष्याविषयी ज्या पद्धतीने विचार केला, तशीच माझी जीवनशैली आहे. यामुळे आमची मैत्रीचे बंधन जोडले गेले आहे. आम्ही दोघे ज्युनियर पातळीपासून एकमेकांविरूद्ध क्रिकेट खेळू लागलो. तो एक अद्भुत व्यक्ती आहे आणि तो तुमचा खूप आदर करतो.”

हेही वाचा पंजाबमध्ये मिल्खा सिंग यांच्या नावाने तयार करण्यात येणार विशेष अध्यासन!

 

विराट कोहलीनंतर केन विल्यमसननेही भारतीय कर्णधाराचे कौतुक केले. ”विराट एक महान खेळाडू आहे. त्याच्यामुळे क्रिकेटही बदलले आहे. त्याच्यात खेळण्यासाठी भूक दिसते आणि त्याचे नेतृत्वही उत्कृष्ट आहे. बर्‍याच वर्षांपासून त्याच्या विरुद्ध खेळणे देखील चांगले आहे.”

हेही वाचा – किती ते प्रेम..! प्रियांकाला प्रपोज करण्यासाठी सुरैश रैनानं गाठलं होतं इंग्लंड!

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना साऊथम्प्टन येथे खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारत आणि न्यूझीलंडदरम्यान आतापर्यंत एकूण ५९ कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी भारताने २१ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने १२ सामने जिंकले आहेत. अनिर्णीत सामन्यांची संख्या सर्वाधिक म्हणजेच २६ इतकी आहे.